Pune : नवीन मराठी शाळेत सौरऊर्जा प्रकल्प सुरू
Updated On:

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत १६ किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी मिलिंद देशमुख यांनी त्यांचे वडील माधवराव यांच्या स्मरणार्थ हा प्रकल्प शाळेला भेट दिला.
या प्रकल्पामुळे शाळेची विजेसंदर्भातील गरज भागणार आहे. डीईएसचे माजी अध्यक्ष शरद कुंटे, वित्त नियंत्रक धनंजय कुलकर्णी, शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग, मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.





