Solapur News : ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांची 151वी जयंती उत्साहात साजरी

माढा : कुर्डूवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची 151वी जयंती त्यांच्या कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाहू महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमात फेस्कॉम, पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष हनुमंत कुंभार गुरुजी आणि समन्वय समितीचे सचिव अर्जुन गाडे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या समाजसुधारणेच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.
या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गणेश व्यवहारे, उपाध्यक्ष नारायणराव कारंजकर, समाजभूषण उत्तरेश्वर जानराव, रामचंद्र डांगे, भीमसेन मिसाळ, सुनील तात्या शिंदे, मिलिंद चव्हाण, संजय तुपारे, बाळासाहेब शेंडगे, अशोक पाटील, शाहू सोनवणे, श्रीमंत वाळके, शिवाजी डांगे, वाहिद शेख, सुभाष चौधरी, अरुण पवार, चांदमौला शेख, अॅडव्होकेट जानराव, मिसेस जानराव यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कुर्डूवाडी ज्येष्ठ नागरिक संघ प्रत्येक महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.





