सोलापुर जिल्हा भाजप अध्यक्षाची बेडरूम क्लीप व्हायरल, राजकीय वर्तुळात खळबळ
Updated On:

सोलापुर – सोलापुर जिल्हा भाजपचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांची एका तरूणीने बेडरूम क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल केल्यानंतर मोठीच खळबळ उडाली आहे. आपल्याला लग्नाचे अमिष दाखवून श्रीकांत देशमुख याने आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप सदर तरूणीने केला असून त्या संबंधीचा व्हिडीओ तिने टाकला आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर श्रीकांत देशमुख यांना तातडीने या पदावरून हटवण्यात आले आहे. सोलापुर भाजप जिल्हाअध्यक्षांनी राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा तातडीने स्वीकारण्यात आल्याची माहिती प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर दिली आहे.
हा आपल्याला हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप देशमुख यांनी केला असून त्यांनीही सदर तरूणीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. सदर तरूणी भाजपचीच पदाधिकारी असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे





