माळशिरस तालुक्यात वरुणराजाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला

Updated On:
माळशिरस तालुक्यात वरुणराजाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला

अकलूज –माळशिरस तालुक्यात वरुणराजाची कृपादृष्टी झाल्याने वेळेत पावसाला सुरुवात झालेली असल्याने वरुणराजाच्या दमदार हजेरीने बळीराजा सुखावला आहे.

अकलूज ता. माळशिरस परिसरात रविवारी सायंकाळी 2 तास दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहेत. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ऊस लागवडीसाठी सरी सोडलेली होती.

अचानक वरुणराजाची हजेरी लागली. दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत दमदार पाऊस पडलेला असल्याने ऊस शेतामध्ये मोठया प्रमाणात पाणी साचलेले दिसत आहे.

बळीराजाने खरीप हंगामासाठी आपली शेतामधील सर्व मशागती करून घेतलेल्या आहेत‌ तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडलेला असल्याने वेळापूर येथील पुणे-पंढरपूर महामार्ग पाण्यात गेला होता. त्यामुळे काही वेळ खोळंबली होती. वाफसा आल्यानंतर पेरणी करण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू होणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Vadgaon Maval : भातपिकांना पावसाची प्रतीक्षा; पावसाच्या दडीने ग्रामीण अर्थचक्राला ब्रेक

2026-10-07 08:06:40

Vadgaon Maval : भातपिकांना पावसाची प्रतीक्षा; पावसाच्या दडीने ग्रामीण अर्थचक्राला ब्रेक

Marathwada : मराठवाड्यात मोठं जलसंकट.! पावसाअभावी पिके हातातून गेली

2026-10-02 18:32:05

Marathwada : मराठवाड्यात मोठं जलसंकट.! पावसाअभावी पिके हातातून गेली

Maharashtra drought : महाराष्ट्रातील दुष्काळावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 3 ऑक्टोबर रोजी विशेष पथके दाखल होणार

2026-09-28 15:52:11

Maharashtra drought : महाराष्ट्रातील दुष्काळावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 3 ऑक्टोबर रोजी विशेष पथके दाखल होणार

Heavy Rainfall: पावसाने शहराला झोडपले; ठिकठिकाणी साचले पाणी

2026-09-22 08:37:28

Heavy Rainfall: पावसाने शहराला झोडपले; ठिकठिकाणी साचले पाणी