सोहेल खान पुन्हा प्रेमात? मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडिओ व्हायरल

Sohail Khan Viral Video | अभिनेता सलमान खानचा भाऊ सोहेल खान सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सोहेल खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तो एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला. त्याच्या या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण आले आहे.
सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा सजदेह यांनी २०२२ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर सोहेलच्या आयुष्यात पुन्हा प्रेम बहरले आहे. सोमवारी रात्री सोहेल एका मिस्ट्री गर्लसोबत डिनर डेटवर दिसला होता, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावरुनच सोहल पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे म्हटले जात आहे. Sohail Khan Viral Video |
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये सोहेल एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत होता आणि त्याच्यासोबत एक मिस्ट्री गर्ल होती. याच मुलीच्या प्रेमात सोहल पडलाय का? असा सवाल आता केला जात आहे. मात्र दोघांच्या नात्याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. Sohail Khan Viral Video |
दोन वर्षांपूर्वीच झाला घटस्फोट
दरम्यान, सीमा सजदेह आणि सोहेल खान यांनी १९९८ मध्ये लग्न केले. २४ वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर त्यांनी दोन वर्षांपूर्वी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०२२ मध्ये या जोडप्याने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. सोहेल खान आणि सिमा सचदेवा यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव निर्वाण खान आणि लहान मुलाचं नाव योहान खान असं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अभिनेता अरबाज खान हा दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. अरबाजनंतर त्याचा लहान भाऊ सोहल खान देखील दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा:
‘सनम तेरी कसम 2’ चित्रपटाच्या सिक्वेलसाठी हर्षवर्धन राणेचे नाव फायनल





