सामाजिक भान जपलेलं नाव… नगरसेवक बॉबी उर्फ अनिल टिंगरे

जगभरात करोनाच्या साथीने थैमान घातले आहे, अशा जीवघेण्या साथीमध्येही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सामाजिक भान जपत आणि राजकरणा पेक्षा समाजकारणाला महत्व देत सर्वसामान्यांच्या मदतीसाठी दिवसरात्र झटणारे नाव म्हणजे नगरसेवक आणि माता जिजाऊ प्रतिष्ठाणचे संस्थापक बॉबी उर्फ अनिल टिंगरे.
लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून ते आज तागायत गेली पाच महिने महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा, जिल्हा प्रशासनास केलेल्या सहकार्यासह, माता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 1 मध्ये लॉकडऊनचा धानोरी पॅटर्न’, डॉक्टर आपल्या दारी उपक्रम, गरजूंना अन्नाधान्याचे वाटप, प्रभागासाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर, कोविड चाचणी केंद्र, प्रभागात औषध फवारणी, विविध ठिकाणी हात निर्जंतूकीकरण यंत्रणा, रक्तदान व आरोग्य शिबीर, गरजूंना घरी जाऊन जेवणाचे वाटप असे अनेक उपक्रम अविरतपणे राबविले आहेत.
हातावर पोट असलेल्यांना मदत
प्रभाग 1 मध्ये कळस- विश्रांतवाडी-धानोरी भागातील हातावर पोट असलेल्या तब्बल 5000 जणांना नगरसेवक टिंगरे यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत दैनंदिन गरजेच्या अन्नधान्याचे कीट वाटप केले. त्यात, गहू, तांदूळ, तूरडाळ, तेल, साखर, भाजीपाला अशा वस्तूंचा समावेश होता. भिमनगर, रामगड, कळस, स.नं 111,112, मुंजाबा वस्ती, धानोरी, कलवड, चौधरीनगर, या भागातील सुमारे दिड ते दोन हजार नागरिकांना अविरतपणेही दररोज अन्नदान करण्यात आले. प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बिपीन पोळ, जगदीश देशपांडे, राजू कुलकर्णी, सुभाष पाटील, शैलेश रणनवरे, शशिकांत भोसले, कैलास गोसावी, माऊली पडवळ, प्रकाश सुतार, अविनाश दिवेकर, विवेक पाटील, योगेश निरभवणे, निळकंठ गाडवे, महेश सगरे, काशिनाथ जाधव, दिनेश साळुंके, सिध्दार्थ तरकसे, राहूल जाधव यांनी मोलाची भूमिका निभावली.
धानोरीत करोना चाचणी केंद्र
प्रभागातील वाढती बाधितांची संख्या रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करण्यात याव्यात यासाठी नगरसेवक टिंगरे यांच्या पुढाकारातून धानोरी येथे कै.बाबुराव माधवराव टिंगरे विद्यालयात करोना चाचणी केंद्र सुरू झाले. या ठिकाणी सुमारे तीनशे ते चारशें चाचणीची क्षमता असलेले केंद्र सुरू झाल्याने तातडीनं बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करून विलगीकरणात ठेवणे शक्य झाले. प्रभागात भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून रॅपिड ऍन्टीजेन टेस्टच्या दोन मोबाईल व्हॅनही टिंगरे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आल्या.
घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी
करोनाच्या साथीला अटकाव घालण्यासाठी नगरसेवक टिंगरे यांच्या माध्यमातून डॉक्टळर आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला. त्यात, धानोरी, मुंजाबा वस्ती, कलवड, खेसे पार्क, परांडे नगर, श्रमिक नगर, कळस, म्हस्के वस्ती, गणेशनगर परिसरात सुमारे 2 ते 3 हजार नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत हे आरोग्य शिबीर घेण्यात आले.
लॉकडाऊनचा धानोरी पॅटर्न’
करोनाच्या साथीमुळे देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरही प्रभाग 1 मध्ये मोठया प्रमाणात नागरिक अत्यावश्यतक साहित्याच्या खरेदीसाठी घराबाहेर पडत होर्ते. त्यामुळे प्रभागात करोना संसर्ग वाढण्याची शक्ययता लक्षात घेऊन नगरसेवक टिंगरे यांनी अत्यावश्य क वस्तू नागरिकांना घरपोच देण्यासाठी पोलिसांच्या मदतीने एक आगळावेगळा उपक्रम राबविला आपल्या माता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून टिंगरे नगर, धानोरी भागातील नागरिकांना दुकानदार आणि नागरीक यांच्यातील दुवा म्हणून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरपोच अन्नधान्य पोहचविले या शिवाय, ठराविकच दुकाने चालू ठेवून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रभागात सोशल डिस्टंन्स ठेवले जावे यासाठी स्वतंत्रपणे उपाय योजना करण्यात आल्या. त्यामुळे या भागात रूग्णवाढ रोखण्यास मदत झाली.
‘करोना’तील उल्लेखनिय काम
– प्रभागात औषध फवारणी
– डॉक्टर आपल्या दारीतून ज्येष्ठांची तपासणी
– सोशल डिस्टंन्ससाठी व्यावसायिकांची जनजागृती
– 1500 हून अधिक गरजूंना लॉकडाऊनमध्ये दररोज अन्नदान
– 5000 हून अधिक गरजूंना अन्नधान्य किट वाटप
– प्रभागासाठी स्वतंत्र करोना चाचणी केंद्र
– रूग्णांसाठी रूग्णवाहीकेची सेवा
– तातडीच्या रक्तदान शिबिरांचे आयोजन





