नवी दिल्ली – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X सलग दुसऱ्या दिवशी डाउन झाले आहे. काल शुक्रवारी (23 मे) देखील X मध्ये अडचणी आल्या होत्या, ज्यामुळे जगभरातील युजर्सना डायरेक्ट मेसेजेस (DMs), नोटिफिकेशन्स आणि लाइक्स यासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागले होते. अनेक युजर्सनी एलॉन मस्क यांना टॅग करत आपली नाराजी व्यक्त केली होती. आज, शनिवारी (24 मे) पुन्हा X उघडताच सर्व काही ठप्प झाल्याचे दिसत आहे. काल काय झाले होते? गुरुवारी दुपारपासून (EDT) X वर समस्या सुरू झाल्या होत्या. हजारो युजर्सनी तक्रार केली की, ते डायरेक्ट मेसेजेस (DMs) पाठवू शकत नव्हते किंवा उघडू शकत नव्हते. वारंवार “काहीतरी चुकले, पुन्हा लोड करा” असा मेसेज येत होता. DownDetector च्या अहवालानुसार, फक्त अमेरिकेतच दुपारी 2 वाजेपर्यंत 6,000 हून अधिक आउटेजच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या. युजर्सची संतप्त प्रतिक्रिया – X वरील समस्यांमुळे त्रस्त झालेल्या युजर्सनी आपला राग व्यक्त करताना एलॉन मस्क यांच्यावर टीका केली. एका युजरने लिहिले, “एलॉन मस्क, कृपया अॅप दुरुस्त करा. मेसेजेस उघडता येत नाहीत, हे खूप वाईट आहे.” दुसऱ्या युजरने म्हटले, “DMs वर नोटिफिकेशन येत आहे, पण अनरीड मेसेज दिसतच नाही.” आणखी एका युजरने लिहिले, “X वर मेसेज, लाइक्स, काहीच चालत नाही. डिस्कॉर्डच बरं आहे.” DMs शिवाय आणखी काय चालत नाही? शुक्रवारी X डाउन झाल्याने युजर्सना फक्त DMs मध्येच नव्हे, तर नोटिफिकेशन्स, लाइक्स आणि रिट्वीट्स यामध्येही अडचणी आल्या. काही युजर्सनी सांगितले की, लाइक केल्यानंतर ते आपोआप काढले जात आहे, तर नोटिफिकेशन्स येतच नाहीत. युजर्सची वाढती नाराजी X सलग दुसऱ्या दिवशी डाउन झाल्याने युजर्समध्ये नाराजी वाढत आहे. अनेकांनी याबाबत सोशल मीडियावर आपली खंत व्यक्त केली असून, प्लॅटफॉर्मच्या तांत्रिक समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. X कडून अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.