Wagholi News : सरकारी वाहन अडवून शासकीय कामात अडथळा; सामाजिक कार्यकर्ते त्रिंबक कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल
Wagholi News : सामाजिक कार्यकर्ते त्रिंबक नारायण कांबळे (रा. कोलवडी) यांच्याविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wagholi News : नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या सरकारी वाहनाला स्वतःची स्कूटी आडवी लावून अडवणे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांशी अरेरावी केल्याच्या आरोपावरून सामाजिक कार्यकर्ते त्रिंबक नारायण कांबळे (रा. कोलवडी) यांच्याविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Wagholi News)
शनिवारी (दि.१७) ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास वाघोली-केसनंद रोडवरील जोगेश्वरी स्कूलजवळ हा प्रकार घडला. पोलिसांनी सीटबेल्ट लावला नसल्याचा मुद्दा उपस्थित करत कांबळे यांनी त्यांना जाब विचारल्याची व्हिडिओ क्लिप यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (Wagholi News)
मात्र, पोलिसांच्या फिर्यादीनुसार सरकारी वाहनाचा मार्ग अडवून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रशांत भगवान धुमाळ (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे. (Wagholi News)
फिर्यादीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्यासह पोलीस वाहन चालक प्रशांत धुमाळ नवरात्रोत्सवानिमित्त विविध मंडळांना भेटी देण्यासाठी आणि बंदोबस्ताच्या अनुषंगाने सरकारी वाहनातून जात होते. (Wagholi News)
त्यावेळी केसनंद रोडवरील जोगेश्वरी स्कूलजवळ कांबळे यांनी त्यांच्या ताब्यातील स्कूटी पोलिसांच्या सरकारी वाहनासमोर आडवी लावल्याचा आरोप आहे. वाहन अडवून कांबळे यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे बोलत अरेरावी केली. (Wagholi News)
त्यामुळे पोलिसांना शासकीय कर्तव्य पार पाडताना अडथळा निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १२६(२), २२१ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ११२ आणि ११७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. (Wagholi News)
सीटबेल्टच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर चर्चा
या घटनेशी संबंधित व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये पोलिसांनी सीटबेल्ट लावला नसल्याचा मुद्दा उपस्थित करून त्यांना जाब विचारण्यात आल्याची चर्चा होती. वाहतुकीचे नियम सर्वांसाठी समान असावेत, मग संबंधित व्यक्ती सामान्य नागरिक असो किंवा पोलीस अधिकारी, अशी भूमिका अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर मांडली. (Wagholi News)
मात्र, पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत वाहन अडवून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे. वाहतुकीच्या नियमांच्या पालनाबाबत उपस्थित झालेला प्रश्न आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप, या दोन्ही मुद्द्यांमुळे या घटनेची चर्चा सुरू आहे. (Wagholi News)
त्रिंबक कांबळे यांचे गंभीर आरोप
पोलीस निरीक्षक गायकवाड आणि त्रिंबक कांबळे यांच्याशी संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कांबळे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आपली बाजू मांडत सीट बेल्ट का लावला नाही, असा जाब विचारला होता. (Wagholi News)
मात्र, याच कारणावरून मोबाईल हिसकावून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्या घरी पोलिसांच्या गाड्या पाठवण्यात आल्याचाही दावा कांबळे यांनी केला आहे. त्याचबरोबर पोलिसांविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन करणार असल्याचा राग धरून कारवाईचा आरोप त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर केला आहे. (Wagholi News)
त्रिंबक कांबळे यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या पत्नी सोनाली कांबळे यांनी देखील पोलिसांवर आरोप करून तक्रार अर्ज दिला आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी कांबळे यांचे मारहाणीचे आरोप फेटाळून लावले असून सीट बेल्ट लावला होता अंधारात दिसले नाही, गाडी आडवी लावून असभ्य भाषेचा वापर केला असल्याचे त्यांनी सांगितले. (Wagholi News)





