पावसात भिजले की भविष्य चांगले असते; गडकरींची शरद पवारांवर खोचक टीका 

मुंबई – पावसात भिजले की चांगले भविष्य असते, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. ते एका मुलाखत कार्यक्रमात नितीन बोलत होते. विधानसभा निवडणुकीत सातारा येथे भर पावसात ७९ वर्षीय पवार यांनी वय आणि प्रकृतीची तमा न बाळगता सभा घेतली. ही सभा चांगलीच गाजली होती.

नितीन गडकरींची मुलाखात सुरु असतानाच पाऊस पडू लागला. त्यावेळी हा पाऊस कसा काय पडतो आहे असे निवेदिका म्हणाल्या तेव्हा गडकरी पटकन म्हणाले पावसात भिजले की भविष्य चांगले असते असे पत्रकार म्हणतात. त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. स्वतः नितीन गडकरींनाही हसू आवरले नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर टोलेबाजी करताना ‘पावसात भिजण्याचा आमचा आनंद कमी पडला’ असा टोला लगावला होता. यावर प्रत्युत्तर देताना खासदार श्रीनिवास पाटील यांनी म्हंटले कि, काळ्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणी सुरू असताना किंवा त्यापूर्वी येणाऱ्या पावसामुळे होणारा आनंद वेगळाच असतो. पावसाचा आनंद मातीशी संबंध असणाऱ्या लोकांनाच होतो. त्यामुळे पावसाचा आनंद जसा शेतकऱ्यांना होतो तसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाला नाही. ते शेतकरी आहेत की नाही हे ही आपल्याला माहीत नाही, अशी बोचरी टीका यांनी फडणवीस यांच्यावर केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.