Aamashya padavi। राज्यात बहुमताच्या जोरावर महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झालंय. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि एकनाथ शिंदे, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ७ तारखेपासून सुरु झालेल्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडत आहे. दरम्यान, काल याच कार्यक्रमात शिंदे गटाच्या एका आमदाराचा शपथ घेताना मोठा गोंधळ झाला. त्याचे व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. दरम्यान , आता याच गोंधळाविषयी खुद्द आमदारांनी स्पष्टीकरण दिले आहे.
शिवेसनेचे (शिंदे) आमदार आमश्या पाडवी यांनी आमदारीकीची शपथ घेतली. मात्र, आमदारीकीची शपथ घेतेवेळी झालेल्या गोंधळामुळे आमश्या पाडवी हे चांगलेच चर्चेत आले आहेत. पाडवी यांना शपथविधीतील एकही शब्द व्यवस्थित वाचता आला नाही. त्यांचा हा शपथविधीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झालाय. यानंतर आता आमश्या पाडवी यांनी गोंधळ का झाला? याचे नेमके कारण सांगितले आहे. ‘शपथ घेताना वाक्य जास्त लांब (मोठं वाक्य) असल्यामुळे अडचण आली’, असे त्यांनी म्हटले आहे.
मा. आमश्या पाडवी यांना आज आमदारकीची शपथ घेतली.#Shivsena #EknathShinde pic.twitter.com/CoOIwXe063
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) December 8, 2024
आमदारकीची शपथ घेताना सर्व परिवार एकत्र असल्याचा आनंद Aamashya padavi।
“आज आमदारकीची शपथ घेतली आनंद आहे. मी परिवारासह शपथविधीसाठी आलो होतो. जेव्हा मी पहिल्यांदा विधानपरिषदेत शपथ घेतली होती. तेव्हा माझ्याबरोबर परिवार आलेला नव्हता. माझी इच्छा होती की मी विधानपरिषदेचा सदस्य असताना मी विधानसभेच्या निवडणुकीत निवडून यायला पाहिजे आणि निवडून देखील आलो. आज आमदारकीची शपथ घेताना सर्व परिवार बरोबर आहे याचा आनंद आहे”, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
“…म्हणून जरा अडचण झाली” Aamashya padavi।
पुढे बोलताना त्यांनी शपथ घेताना नेमकं काय झालं ? याविषयीचे स्पष्टिकरण दिले. याविषयी बोलताना, “माझं शिक्षण कमी आहे, त्यामुळे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बोलत होते. त्यानंतर मी बोलत होतो. मात्र, त्यांनी वाक्य जास्त लांब (मोठं वाक्य) वाचलं. त्यामुळे अडचण आली. कारण माझ्या संपूर्ण परिवारामध्ये चौथी पर्यंत शिकणारा मी पहिला व्यक्ती आहे. तरीही मी सरपंच झालो, पंचायत समीतीचा सभापती झालो आणि दोन वेळा आमदार देखील झालो. कारण मी लोकांमध्ये राहणारा एक व्यक्ती आहे, त्यामुळे लोकांनी मला निवडून दिलं आहे.” असे त्यांनी म्हटले.