Supriya Sule : … तर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील; ‘या’ बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
Supriya Sule : ज्या अदानींचे, नरेंद्र मोदींचे आणि अमित शहांचे मित्र शरदचंद्रजी पवार आहेत, त्या पवारांच्या कन्येला काहीही मिळू शकते.

Supriya Sule : ज्या अदानींचे, नरेंद्र मोदींचे, अमित शहांचे मित्र शरदचंद्रजी पवार आहेत, त्या पवारांच्या कन्येला काहीही मिळू शकते. उद्या अदानींनी मनात आणले तर सुप्रिया सुळे एका क्षणात मुख्यमंत्री होतील. अदानीच इथली सत्ता ठरवतात, हे शक्य आहे, असा खळबळजनक दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. (Supriya Sule)
लक्ष्मण हाके आज पंढरपुरात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप, संघ, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळे एकाच धोरणाने चालले आहेत. विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण हेच आता कळत नाही. (Supriya Sule)
शरदचंद्रजी पवार यांच्यासारखा फुले, शाहू, आंबेडकर यांचा पुरोगामी विचार सांगणारा माणूस जर भाजपच्या हातात हात घालून काम करत असेल, तर पुरोगामी विचार कुठे राहिला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सुप्रिया सुळे या वेगळ्या ओळख असलेल्या खासदार आहेत. (Supriya Sule)
पवारांच्या कन्या म्हणून त्यांची वेगळी ओळख असताना त्या जर भाजपचे समर्थन करत असतील, तर कोण विरोधक? असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. संघामध्ये, काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीत आणि भाजपमध्ये असलेले आमदार-खासदार एकाच धोरणाने काम करत आहेत. (Supriya Sule)
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर देशभरातही हेच चित्र आहे, असे ते म्हणाले. हाके यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. (Supriya Sule)





