…तर शिवसेना नॅपकीन देण्यास तयार – नाना भानगीरे
Updated On:

पुणे – शहरातील मनपा शाळेतील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन पुरवठा वेळेवर पुरवण्यात मनपा यंत्रणेला काही विलंब लागत आहे. त्यामुळे मुलीची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मनपा निविदा प्रक्रिया होईपर्यंत मनपाच्या सर्व शाळात विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन पुरवठा शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यास आम्ही तयार असल्याची माहिती शहर प्रमुख नाना भानगीरे यांनी दिली.
याबाबत आयुक्तांकडे आम्ही याबाबत मान्यता मिळणेची विनंती केली असल्याचेही ते म्हणाले. महापालिकेने गेल्या चार वर्षांपासून मुलींना आरोग्यासाठी आवश्यक असलेले नॅपकीन दिलेले नाहीत. तर गेल्या दोन वर्षात ठेकेदार वादात निविदा रद्द केल्या आहेत.





