Satara: … तर माझा पहिला क्रमांक असेल नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचे प्रत्युत्तर
Satara माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत नदराध्यक्षांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्या घराचे अतिक्रमण वाचवले आहे अशा आशयाची तक्रार करत नगराध्यक्षांना अपात्र करावे, अशी मागणी केली आहे.

Satara: शाहू चौक ते बोगदा परिसर या मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होत आहे. यापूर्वी नगरपालिकेने राबवलेल्या मोहिमेला नागरिकांनी स्वतःहून सहकार्य केले. अदालत वाडा आणि त्याच्या पुढील परिसरातील अतिक्रमणांना लवकरच नोटीसा दिल्या जातील. या रसता रुंदीकरणात माझे घर आले तर मी स्वतःहून ते उतरवून घेईन, त्यात माझा पहिला क्रमांक असेल, असे प्रत्युत्तर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिले.
माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत नदराध्यक्षांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्या घराचे अतिक्रमण वाचवले आहे अशा आशयाची तक्रार करत नगराध्यक्षांना अपात्र करावे, अशी मागणी केली आहे. या तक्रारीला प्रत्युत्तर देताना नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सांगितले की शाहू चौक ते बोगदा यादरम्यानच्या अतिक्रमण मोहिमेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होत आहे. समर्थ मंदिर चौक ते बोगदा या भागातील अतिक्रमण मोहीम पूर्ण झाली असून येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे आणि पॅचिंगचे काम सुरू होणार आहे, पालिकेने राबवलेल्या अतिक्रमण मोहिमेला नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढत मोठे सहकार्य केले आहे.
समर्थ मंदिर चौकातील वाहतुकीच्या कोंडीची संवेदनशीलता मोठी होती म्हणून प्राधान्याने त्या परिसरातील अतिक्रमणे हटवण्याला प्राधान्य देण्यात आले, असे त्यांनी स्पष्ट केले. अतिक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये अदालतवाडा ते शाहू चौक या दरम्यानच्या अतिक्रमणांची त्या संदर्भातील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून नोटिसा काढण्यात येत आहेत. त्याची अंमलबजावणी लवकरच केली जात आहे. रस्ता रुंदीकरणामध्ये माझे स्वतःचे घर येत असल्याची संबंधितांची तक्रार आहे. माझे घर रुंदीकरणात येत असल्यास मी स्वतःहून माझे घर काढून घेईन. येथे मी मागे हटणार नाही, तेथे माझा पहिला नंबर असेल, अशी स्पष्टोक्ती अमोल मोहिते यांनी केली.





