पुणेः दिल्ली विधानसभा निवडणुकीत तब्बल २७ वर्षानंतर भाजपाला हे राज्य काबीज करण्यात अभूतपूर्व यश मिळाले. तीन टर्म दिल्लीत सत्ता असलेल्या आम आदमी पार्टीला मोठा धक्का या निवडणुकीत भाजपने दिला. काँग्रेस पक्षाला तर येथे पुन्हा एकदा दिल्लीकरांनी डावलेली असल्याचे चित्र आहे. काँग्रेसचा एकही उमेदवार येथून निवडून आलेला नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. मात्र, त्यानांही येथे जागा मिळवता आलेली नाही. अशातच शिवसेना शिंदे पक्षाचे मंत्री संजय शिरसाठ यांनी याबाबत दिल्ली निवडणूक कामगिरीवर मोठे विधान केले आहे.
नेमकं काय म्हणाले संजय शिरसाठ?
मंत्री संजय शिरसाठ यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कामगिरीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी पुढील प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांना पुढाकर देण्यासाठी हे जागा लढवणे असते. आता आम्ही शिवसेनेने गोव्यात जागा लढवल्या होत्या, कधी उत्तर प्रदेशात तर कधी दिल्लीतही लढवल्या होत्या. पण काय मिळाले आम्हाला? किती मते मिळाली? हे कधी यशस्वी झाले नाही. म्हणून राष्ट्रवादी एवढ्या लवकर यशस्वी होईल हे स्वप्न पाहणेही चुकीचे असल्याचे शिरसाठ म्हणाले. ही प्रतिक्रिया त्यांनी एका टीव्ही वाहिनीला दिली.
अजित पवारांची पोस्टच्या माध्यमातून प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळाले नसले तरी या निवडणुकीतून आम्हाला खूप शिकायला मिळाले आहे. ही सुरुवात आहे. मिळालेल्या अपयशाचे विश्लेषण करुन भविष्यात देशपातळीवर पक्षबांधणीसाठी अधिक मेहनत घेतली जाईल. दिल्लीसह इतर अन्य राज्यात पक्षाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल, अशी दिल्ली विधानसभा निवडणुकीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या अपयशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पोस्टच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.
दिल्ली विधानसभेतील निर्णायक विजयाबद्दल मी प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्र मोदी जी, केंद्रीय गृहमंत्री मा.श्री. अमित शहा जी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे.पी नड्डा जी यांचं मनापासून अभिनंदन करतो. दिल्लीत स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा देतो.
दिल्ली…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 8, 2025