…तर एका क्षणात पाकिस्तान क्रिकेट मंडळ बंद पडेल – रमीझ राजा
Updated On:

लाहोर –भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले तर एका क्षणात पाकिस्तान क्रिकेट मंडळ बंद पडेल, असे धक्कादायक वक्तव्य मंडळाचे अध्यक्ष व माजी कसोटीपटू रमीझ राजा यांनी केले आहे.
पाकिस्तान मंडळाला वर्षभरात क्रिकेटवर जो काही खर्च करावा लागतो त्यातील तब्बल 50 टक्के वाटा आयसीसीकडून मिळतो. आयसीसीच्या उत्पनातील तब्बल 90 टक्के वाटा बीसीसीआयचा असतो त्यामुळे जर येत्या काळात पंतप्रधान मोदी यांनी ठरवले तर ते कोणत्याही क्षणी आमचे क्रिकेट मंडळ बंद करु शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.
बीसीसीआयकडून आयसीसीला प्रचंड उत्पन्न मिळते त्यामुळे त्यातील वाटा जरी आयसीसी पाकिस्तानला देत असेल तरीही एक प्रकारे बीसीसीआयच पाक मंडळ चालवते त्यामुळे हा निधी थांबला तर मंडळालाच कुलूप लावावे लागेल, असेही ते म्हणाले.





