..म्हणून आडनाव लावत नाही; अभिनेत्री अमृता सुभाषने केला मोठा खुलासा

मुंबई – अभिनेत्री अमृता सुभाष आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. नाटक,टीव्ही मालिका आणि चित्रपट या दिन्हही फॉरमॅटमध्ये अमृताने आपल्याला सिद्ध करत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच अमृताने आपल्या आडनावाबाबत खुलासा केला आहे. अमृता नेहमी आपलं नाव ‘अमृता सुभाष’ असं लावते ती आडनाव लावत नाही.
मराठी इंडस्ट्रीसोबत अमृताने हिंदीमध्ये देखील अनेक दर्जेदार चित्रपट आणि सिरीज केल्या आहेत. गली बॉय सारख्या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंहच्या आईचा रोल करून तिने सर्वांनाच थक्क करून टाकलं. त्यासोबतच नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम या सिरीजमध्ये देखील तिने दमदार अभिनय साकारत नवाझुद्दीन सोबत स्क्रिन शेअर केली होती. नुकतंच अमृताने आपण आडनाव का लावत नाही याबाबत खुलासा केला आहे.
अमृता जेष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांची लेक. आईच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी देखील अभिनयाला सुरुवात केली. आडनावाबाबत सांगताना अमृता म्हणते,”आडनाव लावता न येणं हे माझं हळवं दुःख आहे. आजपर्यंत माझं आडनाव कोणीही बरोबर उच्चारू शकलेलं नाही. ढेंबरे असं माझं आडनाव आहे आणि अनेकदा कुणी ढगे म्हणत,कुणी ढमढेरे तर कुणी ढोले.म्हणून आडनाव लावत नसल्याचे अमृताने यावेळी स्पष्ट केले.
अमृता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती आपल्या आगामी प्रोजेक्टबाबत चाहत्यांना अपडेट देत असते. अमृता सध्या आपल्या ‘पुनश्च हनिमून’ या नाटकाच्या प्रयोगामध्ये व्यस्त आहे. त्यासोबतच ती ‘लस्ट स्टोरीज २’ या चित्रपटात देखील झळकणार आहे.

