साप चावला, बदला घेण्यासाठी तो सापाला चावला; साप मरण पावला आणि तो…
Updated On:

जाजपूर – एकास साप चावल्याची घटना घडली आहे. त्या व्यक्तीने साप चावल्याचा बदला घेण्यासाठी सापालाच चावा घेतला आहे. ही घटना ओडिशामधील जाजपूर जिल्ह्यात घडली आहे. विशेष म्हणजे साप चावल्यावर ती व्यक्ती सुरक्षीत आहे. मात्र सापाचा मृत्यू झाला आहे.
किशोर बद्रा असे या व्यक्तीचे नाव आहे. तो जाजपूरमधल्या दानागढी परिसरात आहे. किशोर शेतातून घरी जात असताना त्याच्या पायाला सापाने चावा घेतला. त्याचा किशोर याला प्रचंड राग आला व त्याने सापाला पकडले व त्यास चावा घेतला.
दरम्यान, किशोर यास शेजारच्यांनी रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला मात्र त्याने नकार देत पारंपारिक पद्धतीनं उपचार करणाऱ्या एका व्यक्तीचा सल्ला घेतला. विशेष म्हणजे हे उपचार केल्यानंतर तो बराही झाला आहे.





