”निवडणुका लागू द्या ममता बॅनर्जी देखील चंडी पाठ करणार” ; स्मृती इराणी असं का म्हणाल्या ? वाचा

Smriti Irani । हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सातत्याने कोंडीत पकडत आहे. या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील पुन्हा एकदा ममता बॅनर्जींवर निशाणा साधलाय. ही निवडणुकीची वेळ आहे, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीय. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशी त्या (ममता) कोणत्या ना कोणत्या व्यासपीठावरून चंडीचे पठण करताना दिसतील” असे म्हणत त्यांच्यावर टीका केलीय.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पश्चिम बंगाल दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी कामगार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी,”ममता बॅनर्जी सीएएच्या नावाने समुदायाला भडकावतील” असे आरोप केले. यावेळी त्यांनी CAA लागू केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना इराणी यांनी, ‘पंतप्रधान मोदींनी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून स्थलांतरित झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन समुदायातील लोकांना पूर्ण सन्मानाने नागरिकत्व देण्याचे वचन पूर्ण केले आहे.
टीएमसीमध्ये गटबाजी सुरू Smriti Irani ।
‘कार्यक्रमात हिंदू समुदायाच्या लोकांनी विशेषतः पंतप्रधान मोदींचे आभार मानले. पण ममता बॅनर्जी व्होट बँकेसाठी काही समाजाची दिशाभूल करतीलअसे म्हणत तयांचयावर निशाणा साधला. तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधत स्मृती इराणी यांनी, ‘तृणमूल काँग्रेसमध्ये भांडण सुरू आहे, कोण बहीण समर्थक आणि कोण पुतण्या समर्थक यावरून भांडण सुरू आहे. हा प्रश्नही पडतो की बहिणीनंतर पुतण्या कोणता नेता असेल?यांच्यात पक्ष गुंतला असल्याचे त्यांनी म्हटले.
निवडणूक म्हणून रामनवमीला सार्वजनिक सुट्टी Smriti Irani ।
टीएमसीमधील गटबाजीकडे बोट दाखवत केंद्रीय मंत्री म्हणाल्या, त्यांनी आमच्याकडे पाहण्याची गरज नाही, कारण धोका त्यांच्याच घरात आहे. ‘ममता बॅनर्जी भारत ब्लॉकच्या त्या नेत्यांशी हातमिळवणी करतात जे सनातन धर्माचा अपमान करतात, मग रामनवमीच्या आधी त्या रामनवमीला सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करतात. हे सर्व फक्त निवडणुकीपुरते आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच रामनवमीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.





