Pratik-Priya Wedding | दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त प्रिया बॅनर्जीसोबत विवाह केला. या जोडप्याने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. सोबत ‘मी प्रत्येक जन्मी तुझ्याशीच लग्न करेन’ असे त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे. यानंतर त्याच्यावर सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होत आहे.
परंतु प्रतीकने लग्नाला त्याच्या कुटुंबियांनाच निमंत्रण दिलेले नाही. आर्य बब्बरने यावेळी त्याच्या कुटुंबातील मतभेदाबाबत सांगितले आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्मिता पाटीलचा लेक प्रतीकचे त्याच्या कुटुंबियांसोबत चांगले संबंध नाही, त्याने कुटुंबाला आपल्यापासून दुर केले आहे. त्यामुळे सर्वांनाच या गोष्टीचा खूप त्रास होतोय, असा खुलासा आर्य बब्बरने केला.
प्रतीक हा राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा आहे, तर आर्या आणि जुही बब्बर ही राजची पहिली पत्नी नादिराची मुलं आहेत. प्रतीकचं हे दुसरे लग्न असून यापूर्वी सान्या सागरशी लग्न झालं होतं. प्रतीक बब्बरने २०२३ मध्ये त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीला प्रपोज केलं होतं. त्यांनी काही महिन्यांपूर्वी साखरपुडाही केला होता.
View this post on Instagram
याआधी प्रतीक सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकला होता. मात्र ४ वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आता प्रतीक आणि प्रिया व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर लग्नबंधनात अडकले आहेत.
प्रिया बॅनर्जी कोण आहे?
प्रतीक बब्बरची दुसरी पत्नी प्रिया ही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य सिनेमातून तिने करिअरला सुरुवात केली होती. याशिवाय प्रिया ऐश्वर्या राय-बच्चनच्या ‘जज्बा’ चित्रपटात झळकली होती. तिने ‘बेकाबू’, ‘राणा नायडू’ आणि ‘हॅलो मिनी’ यांसारख्या सीरिजमध्ये काम केलं आहे.
प्रतीक बब्बरच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर त्याने इश्क, धोबी घाट, छिछोरे, जाने तू,या जाने ना, बागी २, दम मारो दम, एक दिवाना था, मुल्क यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.