Smartphone Tips: आजच्या काळात स्मार्टफोन वापरताना इंटरनेट आणि कॉल एकत्र चालणं खूप गरजेचं आहे. पण अनेकांना एक सामान्य समस्या भेडसावते, ती म्हणजे फोन कॉल आला की इंटरनेट अचानक बंद होतं. कॉलवर असताना फाइल पाठवायची असेल किंवा काही सर्च करायचं असेल, तेव्हा ही समस्या खूप त्रासदायक ठरते. मात्र, काही सोप्या सेटिंग्स बदलून ही अडचण सहज दूर करता येते. Smartphone Tips ही समस्या का होते, हे आधी समजून घेऊया. जुन्या 2G आणि 3G नेटवर्कमध्ये कॉल आणि इंटरनेट एकाच वेळी चालत नव्हते. आता 4G आणि 5Gमध्ये ही सुविधा आहे. पण जर तुमच्या फोनमध्ये VoLTE (व्हॉइस ओव्हर एलटीई) फीचर बंद असेल, तर कॉल आला की फोन आपोआप 4G वरून 2G किंवा 3Gवर जातो. त्यामुळे इंटरनेट बंद होतं. Smartphone Tips ही समस्या सोडवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे VoLTE सुरू करणं. त्यासाठी फोनच्या Settings मध्ये जाऊन Mobile Network किंवा SIM Card पर्याय निवडा. त्यानंतर VoLTE किंवा 4G Calling हा पर्याय शोधून तो On करा. यामुळे कॉल चालू असतानाही इंटरनेट सुरू राहील. दुसरी महत्त्वाची सेटिंग म्हणजे नेटवर्क मोड (Preferred Network Type). काही वेळा चुकून फोन 2G Only किंवा 3G Only मोडवर सेट होतो. त्यामुळे इंटरनेट नीट चालत नाही. त्यामुळे सेटिंग्समध्ये जाऊन 4G/3G/2G (Auto) किंवा 5G/4G/3G/2G (Auto) हा पर्याय निवडणे गरजेचे आहे. Smartphone Tips Smartphone Tips जर तुम्ही ड्युअल सिम वापरत असाल, तर आणखी एक उपयुक्त सेटिंग आहे. “Data during calls” किंवा “Switch data connection during calls” हा पर्याय ऑन केल्यास, एका सिमवर कॉल आला असताना दुसऱ्या सिमवरून इंटरनेट सुरू राहू शकते. त्यामुळे इंटरनेट कट होण्याची समस्या टाळता येते. जर या सेटिंग्स केल्यानंतरही समस्या कायम असेल, तर APN (Access Point Name) सेटिंग रीसेट करणे उपयोगी ठरू शकते. त्यासाठी SIM सेटिंगमध्ये जाऊन “Reset to Default” पर्याय निवडा. याशिवाय, “Reset Network Settings” केल्यानेही अनेक नेटवर्क समस्या दूर होतात. मात्र, हे करताना तुमचे Wi-Fi पासवर्ड आणि ब्लूटूथ कनेक्शन डिलीट होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. कधी कधी समस्या सिम कार्डमुळेही असू शकते. जर तुमचं सिम खूप जुनं असेल, तर ते नवीन तंत्रज्ञान (VoLTE किंवा 5G) सपोर्ट करत नाही. अशा वेळी जवळच्या सर्विस सेंटरमध्ये जाऊन सिम अपग्रेड करून घ्यावी. Smartphone Tips तसेच, नेटवर्क सिग्नलही महत्त्वाचा घटक आहे. जर सिग्नल कमजोर असेल, तर फोन इंटरनेटपेक्षा कॉलला प्राधान्य देतो आणि इंटरनेट बंद होऊ शकतं. एकंदरीत, ही समस्या मोठी नाही आणि काही साध्या सेटिंग्स बदलून ती सहज सोडवता येते. योग्य सेटिंग्स केल्यास तुम्ही कॉल करतानाही इंटरनेटचा वापर सहज करू शकता. Smartphone Tips