Smartphone : स्मार्टफोनच्या निर्यातीत भारत तिसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली : स्मार्टफोनची निर्यात करणारा भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश ठरला आहे. २०१९ मध्ये स्मार्टफोनच्या निर्यातीत भारत जगभरात १९ व्या क्रमांकावर होता. कंपन्या प्रस्तुत आकडे आणि उद्योग संघटनांच्या एकत्रितपणे आकड्यांनुसार, नोव्हेंबर 2024 मध्ये देशातून स्मार्टफोन एक्सपोर्ट ने मात्र एक महिन्यात 20 हजार करोड रूपयांचा आकडा पार केला.
कंपन्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार आणि उद्योग क्षेत्रातील संघटनांच्या एकत्रित आकडेवारीनुसार २०२४ मध्ये देशातून स्मार्टफोनच्या निर्यातीने २० हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक, माहीती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर या संदर्भातील वृत्त शेअर केले असून भारतातून होणाऱ्या स्मार्टफोनच्या निर्यातीचे कौतुक केले आहे. ही उपलब्धी म्हणजे मेकिंग भारत स्टोरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उद्योग संघटनांच्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात देशातून २० हजार ३९५ कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची निर्यात झाली होती. गेल्या वर्षी याच काळात देशातून १० हजार ६३४ कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची निर्यात झाली होती, त्याच्या तुलनेत या वर्षाच्या निर्यातीमध्ये तब्बल ९२ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये उत्पादन मूल्याच्या ७० ते ७५ टक्के निर्यात करण्याच्या उत्पादन आधारीत प्रोत्साहन योजनेचा परिणाम म्हणून स्मार्टफोनच्या निर्यातीतील हे यश मिळू शकले आहे.





