\n

असलंकाची 97 धावांची नाबाद खेळी… 

\n

पल्लेकेलेच्या मैदानावर श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि 36 धावसंख्येवरच त्यांचे दोन्ही सलामीचे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये गेले होते. मात्र यानंतर कुसल मेंडिस आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सदिरा समरविक्रमा यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर सदिरा 61 चेंडूत तीन चौकारांसह 52 धावा करून माघारी परतला. यानंतर मेंडिसही 65 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकारासह 61 धावा करून बाद झाला. पण नंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चरित असलंकाने फलंदाजी करताना धुमाकूळ घातला आणि शेवटपर्यंत 74 चेंडूंत 9 चौकार आणि दोन षटकारांसह 97 धावांची नाबाद खेळी खेळली पण शतक करण्यास तो अपयशी ठरला. तर झेनिथ लियानागेनेही 48 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांसह 50 धावा केल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने निर्धारित 50 षटकात 6 गडी गमावून 308 धावसंख्येपर्यत मजल मारली होती.

\n

अवघ्या 25 धावांत अफगाणिस्तानने गमावल्या 9 विकेट…

\n

विजयासाठी 309 धावांचा पाठलाग करणाऱ्या अफगाणिस्तान संघाला 31 धावांच्या स्कोअरवर रहमानउल्ला गुरबाज (8 धावा) च्या रूपाने पहिला धक्का बसला. मात्र, यानंतर इब्राहिम झद्रान आणि रहमत शाह यांनी संघाची धुरा सांभाळत संघाची धावसंख्या 100 च्या पुढे नेली. या दोघांची फलंदाजी पाहून अफगाणिस्तान हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण त्यानंतर श्रीलंकेचा स्टार फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा गोलंदाजीत उतरला.

\n

हसंरगाच्या गोलंदाजीपूर्वी असिथा फर्नांडोने 128 धावांवर इब्राहिम झद्रान (54 धावा) याला बाद केले. यानंतर हसरंगाने आपल्या गोंलदाजीची जादू सुरू केली. यानंतर सेट दिसत असलेल्या रहमत शाहला (63 धावा) त्याने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हसरंगा इथेच थांबला नाही, त्याने अफगाणिस्तानचा कर्णधार हसमतुल्ला शाहिदी (9 धावा), मोहम्मद नबी (1 धावा) आणि गुलबदिन नायब (0 धावा) यांनाही तंबूचा रस्ता दाखवला.

\n

#U19WorldCup : कोण आहे चंदीगडचा ‘हरजस सिंग’? ज्याच्यामुळे टीम इंडियाचं विजेतेपदाचं स्वप्न मिळालं धुळीस…

\n

\n

वानिंदू हसरंगाला इतर गोलंदाजांनी सुरेख साथ लाभली. यानंतर अफगाणिस्तानच्या इतर फलंदाजांना एकापाठोपाठ पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचे काम इतर गोलंदाजांनी केले. श्रीलंकन ​​संघाच्या या शानदार गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानच्या शेवटच्या 9 फलंदाजांना केवळ 25 धावांची भर घालता आली. इब्राहिम आणि रहमतशिवाय इतर 9 फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाही. या सामन्यात हसरंगाने शानदार गोलंदाजी करत 6.5 षटकात 27 धावा देत 4 बळी घेतले. त्याने शाह, शाहिदी, नबी आणि नायब यांच्या महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. तर असिथा फर्नांडो आणि दिलशान मदुशंका यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर प्रमोद मदुशन याला 1 यश मिळाले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#SLvAFG 2nd ODI : श्रीलंकेच्या गोलंदाजांचा अचूक मारा, अफगाणिस्तानच्या 25 धावांत 9 विकेट घेत केला मालिकेवर कब्जा…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/sl-vs-afg.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/slvafg-2nd-odi-match-sri-lanka-defeated-afghanistan-won-the-second-odi-by-155-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/sl-vs-afg.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/slvafg-2nd-odi-match-sri-lanka-defeated-afghanistan-won-the-second-odi-by-155-runs#webpage","name":"#SLvAFG 2nd ODI : श्रीलंकेच्या गोलंदाजांचा अचूक मारा, अफगाणिस्तानच्या 25 धावांत 9 विकेट घेत केला मालिकेवर कब्जा…","url":"https://www.dainikprabhat.com/slvafg-2nd-odi-match-sri-lanka-defeated-afghanistan-won-the-second-odi-by-155-runs","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/slvafg-2nd-odi-match-sri-lanka-defeated-afghanistan-won-the-second-odi-by-155-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/sl-vs-afg.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/slvafg-2nd-odi-match-sri-lanka-defeated-afghanistan-won-the-second-odi-by-155-runs#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/slvafg-2nd-odi-match-sri-lanka-defeated-afghanistan-won-the-second-odi-by-155-runs","name":"#SLvAFG 2nd ODI : श्रीलंकेच्या गोलंदाजांचा अचूक मारा, अफगाणिस्तानच्या 25 धावांत 9 विकेट घेत केला मालिकेवर कब्जा…"}}]}}}

#SLvAFG 2nd ODI : श्रीलंकेच्या गोलंदाजांचा अचूक मारा, अफगाणिस्तानच्या 25 धावांत 9 विकेट घेत केला मालिकेवर कब्जा…