शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; कोणत्या शेअर्समध्ये झाली घसरण ?

Stock Market | देशांतर्गत शेअर बाजाराची आज सुस्तपणे सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील बंदच्या तुलनेत सेन्सेक्स 50 अंकांनी घसरून 81,476 वर उघडला. तर निफ्टी 37 अंकांनी घसरून 24,604 वर तर बँक निफ्टी 190 अंकांनी घसरून 53,201 वर उघडला आहे.
तर जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत आहेत. अमेरिकेच्या बाजारपेठांमध्येही संमिश्र कल दिसून येत आहेत. काल टेक शेअर्सच्या जोरावर नॅसडॅकनं सलग आठव्या दिवशी ३५० अंकांची झेप घेत पहिल्यांदाच २०,००० च्या वर उसळी घेतली आणि सलग पाचव्या दिवशी डाऊ १०० अंकांनी घसरून बंद झाला.
कोणत्या शेअर्समध्ये घसरण ?
आरोग्य सेवा निर्देशांकात तेजी दिसून आली. तर आयटी, मेटल आणि फार्मा निर्देशांक वधारले. तर निफ्टीवर हिंडाल्को, ओएनजीसी, टेक महिंद्रा, सिप्ला, टीसीएस या शेअरमध्ये तेजी होती. तर अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय लाइफ, ट्रेंट, बजाज ऑटो, एशियन पेंट मध्ये घसरण झाली.
सध्या गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेतून येणाऱ्या महागाईच्या आकडेवारीवर खिळल्या आहेत. या आकडेवारीचा जागतिक बाजारांवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे भारतीय शेअर बाजारावरही परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, काल 11 डिसेंबर रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी थोड्या वाढीसह बंद झाले. व्यवहारादरम्यान आयटी, ऑटो, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि टेलिकॉम समभागांमध्ये सर्वाधिक खरेदी दिसून आली. दुसरीकडे, बँकिंग, युटिलिटी आणि पॉवर समभागांमध्ये विक्रीचा कल होता.
व्यवहाराच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स 16.09 अंकांच्या किंवा 0.02 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 81,526.14 वर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 31.75 अंकांच्या किंवा 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 24,641.80 वर बंद झाला होता.





