पुणे जिल्हा | खानवडीला सौर प्रकल्पासाठी 883 झाडांची कत्तल

सासवड, (प्रतिनिधी) – खानवडी (ता. पुरंदर) येथील गट नं 43 मधील 20 हेक्टर 50 आर जागमधील मुख्यमंत्री गीर कुपी वाहिनी योजना अंतर्गत सौरऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीवरील झाड काढण्यासाठी परवानगी देण्यात आली असून या प्रकल्पासाठी 883 झाडांचे कत्तल करण्यात येणार आहे.
खानवडी येथील गट नं 43 मधील 20 हक्टर 53 आर जागचा ताबा जिल्हाधिकारी कार्यालय (महसूल शाखा) यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्था) स्या. वा. उपविभाग बारामती यांना आगाऊ दिला आहे.
या दिलेल्या ताबा क्षेत्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजने अंतर्गत सौरऊजार्र् प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमीनवरील झाडे काढण्यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्था) उपविभाग बारामती यांनी मंगळवारी (दि. 1) परवानगी अर्ज केला होता.
त्याअनुषंगाने खानवडी येथील जमीन गट क्रमांक 43 मधील दोन पंचासह झाडे परवानगीबाबत या अर्जावरील संदर्भान्वे वनपाल सासवड यांनी पाहणी व पंचनामा केला असून पंचनाम्या प्रमाणे संबंधित क्षेत्र विकसीत करणे करिता अडचण करणारी झाडे तोडताना, झाडे काढताना शेजारील लोकांना त्रास होणार नाही, झाडावर असणा-या पक्षांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी, या सूचनांवर परवानगी दिली आहे.
ही झाडे तोडणार
बाबुळ : 40
ग्लेरीसिडीया : 66
निलगिरी : 362
शिसु : 2
लिंब : 413
एकूण : 883
आठच दिवसांत मिळाली परवानगी
ही झाडे तोडण्याकरता दि. 1 सप्टेंबर 2024 रोजी वनविभागाकडे अर्ज करण्यात आला व यानंतर तात्काळ परवानगी देण्यात आली व बुधवार (दि. 1) झाडे तोडण्याचे काम सुरू करण्यात आले,
अवघ्या 8 दिवसांमध्ये वनविभागाची परवानगी मिळाली असल्यामुळे ग्रामस्थ देखील आश्चर्यचकित झाले आहेत.
ग्रामसभेचा ठराव झिडकारला?
ग्रामसभेने या प्रकल्पाला विरोध असल्याचा ठराव केल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर ग्रामसभेने ठराव करून देखील वनविभागाच्या अधिकार्यांनी परवानगी दिली असल्यामुळे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा आहे.





