सियावर रामचंद्र कि जय…! “बलिदान, त्यागामुळे प्रभू राम पुन्हा अवतरले”- पंतप्रधान मोदी

Ram Mandir : देशभरातील रामभक्तांची 500 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण आज अयोध्येत रामललाचा प्राणप्रतिष्ठाचा सोहळा पूर्ण झाला आहे. राम मंदिराच्या गर्भगृहात रामलला विराजमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राण प्रतिष्ठा करून रामलला राम मंदिरात विराजमान झाले आहेत. दरम्यान, पूजेनंतर मंदिरात उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना संबोधित केला. यावेळी त्यांनी बलिदान, त्यागामुळे प्रभू राम पुन्हा अवतरले असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून ज्येष्ठ नेतेमंडळी, तसेच सेलिब्रेटी आणि रामभक्त उपस्थित होते. त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सियावर रामचंद्र कि जय…! म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. आज आमचा राम आला आहे. 22 जानेवारी 2024 चा हा सूर्य एक नवीन अशा घेऊन आला आहे.’ असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना त्यांनी आपल्याला खूप काही सांगायचे आहे, पण माझा कंठ दाटून येत आहे. हा क्षण अलौकिक आणि पवित्र असल्याचे त्यांनी सांगितले. शतकांच्या तपश्चर्येनंतर राम परतले आहे. असे त्यांनी म्हटले. तसेच मी प्रभू रामाचीही माफी मागतो. एवढा वेळ लागला राम मंदिराची निर्मित करण्यास वेळ लागला असे म्हटले. तसेच अयोध्या वासियांनी शेकडो वर्ष विरह सहन केला. असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी,”आजपासून हजार वर्षांनंतरही लोक या तारखेबद्दल, या क्षणाबद्दल बोलतील. हा रामाचा खूप मोठा आशीर्वाद आहे की आपण सर्वजण हा क्षण जगत आहोत आणि प्रत्यक्षात घडताना पाहत आहोत.” असे त्यांनी म्हटले. राम मंदिरासाठी अनेकांचे बलिदान गेले आहे. आजपर्यंत लोकांनी राम जगले आहेत.कारसेवक, संतमहतांचेचे आपल्यावर कर्ज आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.





