Snake Rescue : सहा मिनिटांचं थरारनाट्य ! महिला वन अधिकाऱ्याने १६ फूट किंग कोब्राला नमावलं, Video पाहाच

Kerala | king cobra | Viral Video | Snake Rescue : केरळमधील एक धक्कादायक आणि हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फॉरेस्ट बीट ऑफिसर जी.एस. रोशनी एका महाकाय किंग कोब्राला धाडसीपणे वाचवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ निवृत्त वन अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये, रोशनी उथळ ओढ्यात साप पकडणाऱ्या काठीच्या मदतीने सापाला अतिशय कुशलतेने हाताळताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी या महिला अधिकाऱ्याचे कौतुक करत आहेत.
ही तीच जागा आहे जिथे गावकरी सहसा आंघोळीसाठी येतात. तिथे किंग कोब्रा दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच वन विभागाचे रॅपिड रिस्पॉन्स टीम घटनास्थळी पोहोचले, ज्यामध्ये रोशनी देखील होती.
My salutations to the green queens & the bravery shown by them in wild🙏
Beat FO G S Roshni, part of Rapid Response Team of Kerala FD rescuing a 16 feet king cobra.This was the 1st time she was tackling a king cobra though she is credited to have rescued more than 800 snakes… pic.twitter.com/E0a8JGqO4c
— Susanta Nanda IFS (Retd) (@susantananda3) July 7, 2025
घाबरून न जाता, रोशनीने सापाला साप पकडण्याच्या काठीने हाताळले आणि काही मिनिटांतच त्याला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर, त्याला जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
१६ फूट लांबीच्या किंग कोब्राला ६ मिनिटांत नियंत्रित करण्यात आले
सुशांत नंदा यांनी व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, जंगलातील धाडसी राणी सलाम.! वन अधिकारी जी.एस. रोशनीने १६ फूट लांबीच्या किंग कोब्राला वाचवले. या प्रजातीच्या सापाला हाताळण्याची ही पहिलीच वेळ होती, तर तिने आधीच ८०० हून अधिक सापांना वाचवले आहे. सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी रोशनीच्या धाडसाचे आणि शांत स्वभावाचे कौतुक केले.
एका वापरकर्त्याने लिहिले, राणीने राजाला हाताळले, ती खरोखरच प्रेरणा आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, आयएफएस अधिकारी आणि वन ग्राउंड स्टाफ खरे कर्तव्य बजावतात. त्यांना आयएएसपेक्षा जास्त आदर मिळाला पाहिजे. अनेक नेटकरी यावर कमेंट करत आहेत.
तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, तिच्या शौर्याला सलाम. जी.एस. रोशनी गेल्या ८ वर्षांपासून केरळ वन विभागात काम करत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत ८०० हून अधिक विषारी आणि बिनविषारी सापांची सुटका केली आहे, परंतु हे त्यांचे पहिले किंग कोब्रा रेस्क्यू होते आणि तिने हे काम कुशलतेने केले आहे.





