हेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता सोरेन यांची पक्षाला सोडचिट्ठी ; वाचा राजीनामा देण्याचे कारण काय ?

Sita Soren । झारखंड मुक्ती मोर्चाला मंगळवारी झारखंडमध्ये मोठा धक्का बसला. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची वहिनी आणि पक्षाच्या आमदार सीता सोरेन यांनी JMM चा राजीनामा दिला आहे. हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सीता सोरेन या संतप्त असल्याचं म्हटलं जात होतं. झारखंडमध्ये चापई सोरेन यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकारवर त्यांची नाराजी असल्याचे म्हटले जात होते. सीता सोरेन जामा मतदारसंघातून आमदार आहेत.
भाजपमध्ये प्रवेश करणार? Sita Soren ।
चंपाई सोरेन यांनी २ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी सीता सोरेन यांना मंत्री बनवण्याची चर्चा होती. एवढेच नाही तर सीता सोरेन यांना महिला आयोग किंवा अन्य कोणत्याही आयोगाच्या अध्यक्षा करून त्यांना मंत्रीपदाचा दर्जा दिला जाऊ शकतो, अशीही चर्चा होती. पण असे झाले नाही. सध्या सीता सोरेन यांनी त्यांचे पुढील पाऊल काय असेल याबाबत काहीही सांगितलेले नाही. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
2009 च्या निवडणुकीत पहिल्यांदा आमदार Sita Soren ।
सीता सोरेनची आणखी एक ओळख म्हणजे त्या JMM प्रमुख शिबू सोरेन यांची सून आहे. याशिवाय त्या दिवंगत दुर्गा सोरेन यांच्या पत्नी आहेत. 2009 मध्ये झारखंडच्या जामा मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या. निवडणुकीतील विजयानंतर त्यांची झारखंड मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली.
2014 मध्येही सीता सोरेन यांनी झारखंड विधानसभेची निवडणूक जामा प्रदेशातून लढवली होती आणि त्या जिंकल्या होत्या. यानंतर पुन्हा 2019 मध्ये जामा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली. सीता सोरेन यांच्यावर 2012 च्या राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी पैसे घेतल्याचा आरोपही झाला आणि त्या सात महिने तुरुंगात राहिल्या.
हेही वाचा
“आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेल”; अटकेच्या कारवाईनंतर विधानसभेत हेमंत सोरेन यांचे विधान





