Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या निवासस्थानी एसआयटीचे अधिकारी दाखल; नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपांप्रकरणी विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीला वेग आला आहे.

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपांप्रकरणी एसआयटीच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीचे अधिकारी जालना जिल्ह्यातील अंकुशनगर येथे मनोज जरांगे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. (Manoj Jarange)
काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी पत्रकार परिषदेत ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आणत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची घोषणा केली होती. (Manoj Jarange)
आता या ऑडिओ रेकॉर्डिंगसंदर्भात चौकशी करण्यासाठी आणि जरांगे यांच्याकडील रेकॉर्डिंगसह संबंधित पुरावे ताब्यात घेण्यासाठी एसआयटीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे. (Manoj Jarange)
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौरा; मराठा बांधवांच्या अडचणी जाणून घेणार




