T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजच्या माजी क्रिकेटपटूकडून विराट कोहलीला मिळाली खास भेट..

T20 World Cup 2024 (Virat Kohli) : वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज सर वेस्ली हॉलने भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना त्याचे पुस्तक भेट दिले. 87 वर्षीय माजी क्रिकेटपटू त्यांच्या पहिल्या सुपर 8 सामन्यापूर्वी केन्सिंग्टन ओव्हल येथे या तिघांना भेटले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वेस्ट इंडिजचे 86 वर्षीय दिग्गज क्रिकेटपटू वेस्ली हॉल यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. सराव सत्रादरम्यान भारताचा विस्फोटक फलंदाज विराट कोहलीने वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू वेस्ली हॉल यांची भेट घेतली.
#WATCH | Former West Indies cricketer Wesley Hall met Indian cricketer Virat Kohli and gifted his book to him, in Barbados. pic.twitter.com/RPbVaIdiBV
— ANI (@ANI) June 18, 2024
या भेटीदरम्यान त्यांनी विराटला एक खास भेटवस्तूही दिली. सराव सत्रानंतर कोहली वेस्ली यांची भेट घेत त्यांच्यासह गप्पा रंगवतानाही दिसला. यादरम्यान वेस्ली यांनी कोहलीला आपले आत्मचरित्रपर पुस्तक ‘आन्सरिंग द कॉल: द एक्स्ट्राऑर्डिनरी लाइफ ऑफ सर वेस्ली हॉल’ भेट दिले.
सर वेस्ली इतर अनेकांप्रमाणेच विराट कोहलीवर खूप प्रभावित झाले आणि त्यांनी कोहलीला आणखी शतके झळकावण्यास सांगितले आणि ते म्हणाले की, तो या खेळातील महान खेळाडूंपैकी एक आहे.





