पुणे | महाराज, आम्हाला माफ करा…
Updated On:

पुणे {प्रभात वृत्तसेवा}- सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक पडला. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. यावर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक घालून त्यांची माफी मागण्यात आली.
या वेळी पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात वाईट कामांची प्रतीकात्मक दहीहंडी फोडण्यात आली. आगामी निवडणुकीत या तीन पक्षांच्या सरकारच्या पापांचा घडा जनता फोडणार अशी टीका करण्यात आली.
आंदोलनप्रसंगी किशोर कांबळे, स्वाती पोकळे, काकासाहेब चव्हाण, रोहन पायगुडे, विक्रम जाधव, रत्नप्रभा जगताप, फाईम शेख, रमीज सय्यद, कणव चव्हाण, संजय गाडे, नितीन जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





