‘सिंघम अगेन’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित; बॉलीवूडमध्ये रचला नवा इतिहास

Singham Again Trailer Release | बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अजयसह अनेक तगडे कलाकार आहेत. ज्यात त्यांची झलक या ट्रेलरद्वारे दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे मात्र त्यापूर्वी ‘सिंघम अगेन’ चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अल्पावधीत या चित्रपटाच्या ट्रेलरला मोठा प्रतिसाद मिळाला.
विशेष म्हणजे ४ मिनिट ४५ सेकंद एवढा मोठा हा हिंदी सिनेमाच्या इतिहासातला पहिलाच ट्रेलर आहे. ‘सिंघम अगेन’ हा रामायणाच्या थीमवर आधारित असल्याचं दिसते. अजय देवगण आणि करीना कपूर हे पती पत्नी असून करीनाचा जीव वाचवण्यासाठी अजय देवगण म्हणजेच बाजीराव सिंघम लंका दहन करणार आहे.
अर्जुन कपूरला कलियुगातला रावण दाखवण्यात आला आहे. तर दीपिका पदुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसत आहे. रणवीर सिंह सिंबाच्या भूमिकेत असून तो बाजीराव सिंघमचा भक्त म्हणजेच हनुमान साकारत आहे. Singham Again Trailer Release |
View this post on Instagram
तर टायगर श्रॉफ बाजीराव सिंघमचा चाहताच असून पोलिसाच्याच भूमिकेत आहे .ट्रेलरच्या शेवटी हेलिकॉप्टरमधून अक्षय कुमारची म्हणजेच सूर्यवंशी ची दमदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे. श्वेता तिवारी आणि दया देखील चित्रपटात आहे. सध्या या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवली आहे. Singham Again Trailer Release |





