Singham Again: “आला रे आला सिम्बा आला…”; ‘सिंघम अगेन’ मधील रणवीरचा फर्स्ट लूक समोर

Entertainment : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या त्याचा ‘सिंघम अगेन’ (Singham Again) हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचे दोन्ही भाग यशस्वी ठरले होते. या सिनेमाच्या दोन्ही भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ‘सिंघम अगेन’ चित्रपट पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. नुकतेच या चित्रपटातील अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
रणवीर सिंहने ‘सिंघम अगेन’ या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पोस्टरमध्ये रणवीर सिंहचा धमाकेदार लूक पाहायला मिळत आहे. वर्दीतील त्याच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्टर शेअर करत रणवीरने लिहिलं आहे, “सबसे नटखट, सबसे निर्जळ…आला रे आला सिम्बा आला.” रणवीरच्या या पोस्टला चाहत्यांची देखील पसंती मिळत आहे.
View this post on Instagram
या सिनेमात बाजीराव सिंघम अर्थात अजय देवगनसह सिम्बा लूकमध्ये रणवीर सिंह दिसणार आहे. या सिनेमात टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या कलाकारांचाही अॅक्शन मोड पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील दीपिकाचा लुक रिलीज करण्यात आला होता. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘सिंघम अगेन’ (Singham Again) सिनेमातील दीपिका पदुकोणचा लूक आऊट करण्यात आला होता. या नव्या लूकमध्ये दीपिका (Deepika Padukone) खूपच खतरनाक दिसत आहे. रोहित शेट्टीने अभिनेत्रीचे वेगवेगळ्या रुपातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
‘सिंघम अगेन’ सिनेमातील दीपिकाचा लूक शेअर करत रोहित शेट्टीने लिहिले होते की, “नारी सीता का भी रूप है और दुर्गा का भी…यए हमारी शक्ती शेट्टी…मेरी लेडी सिंघम..दीपिका पदुकोण”. रोहित शेट्टीने शक्ती शेट्टीला सर्वात क्रूर ऑफिसर म्हंटले होते. दरम्यान, ‘सिंघम अगेन’ हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.





