सिंघम ३ ची तयारी सुरु, अजय देवगनसह रोहित शेट्टी करणार धमाल

मुंबई – रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांच्या सिंघम या सुपरहिट मालिकेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. चाहते बऱ्याच दिवसांपासून सिंघम ३ ची वाट पाहत होते. मात्र आता रोहित शेट्टीने या चित्रपटाबाबत संकेत दिले असून यावेळी तो मोठी धमाल करण्याची तयारी करत आहे. सिंघम आणि सिंघम रिटर्न्सला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले. रोहित शेट्टीच्या सूर्यवंशीमध्ये अक्षय कुमारसोबत सिंघम आणि सिंबा देखील दिसले होते.
एका मुलाखतीत रोहित शेट्टीने सिंघम ३ बाबत खुलासा केला तो म्हणाला, ‘आम्ही सिंघम ३ वर काम सुरू केले आहे. पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये आम्ही शूटिंग सुरू करणार आहोत. अजय सर सध्या त्यांच्या कमिटमेंट्समध्ये व्यस्त आहेत आणि मीही सर्कसमध्ये व्यस्त आहे. अशाप्रकारे रोहित शेट्टी पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्यांवर चित्रपट बनवून एक नवा विक्रम बनवणार आहे.
अजय देवगणला पुन्हा एकदा पोलीस रूपात पाहण्याची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. त्यासोबतच रोहित शेट्टीची दमदार ऍक्शन आणि कॉमेडीदेखील प्रेक्षकांना पाहायची आहे.





