Delhi Assembly Elections 2025 | नवी दिल्ली विधानसभेतील आपचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संपूर्ण घटनेवर आप कार्यकर्त्यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या समर्थकांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. यातच आता या हल्ल्यावरून मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
दिल्लीच्या सीएम आतिशी म्हणाले, “निवडणुकीतील पराभवाच्या भीतीपोटी भाजप हे काम करत आहे. अरविंद केजरीवाल यांना मारण्यासाठी गुन्हेगार आणि गुंड पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ल्यात सहभागी असलेला व्यक्ती रोहित त्यागी, जो सतत प्रवेश वर्मांनसोबत असतो जो त्यांच्याप्रचारात सहभागी होता.”
त्या पुढे म्हणाल्या, “या प्रकरणातील दुसरा आरोपी देखील गुन्हेगार आहे. त्याच्यावर 2011 मध्ये चोरीचा आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे, ज्यामध्ये 10 वर्षांची शिक्षा आहे. तिसऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तिथे उपस्थित होता, तो सुमित आहे, त्याच्यावर चोरी, दरोडा आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही प्रलंबित आहे.” Delhi Assembly Elections 2025 |
#WATCH | Delhi CM Atishi says “It is clear that criminals and goons were sent to kill Arvind Kejriwal. The second person involved in the attack is Rohit Tyagi, who constantly stays with Pravesh Verma and has been involved in campaigning for Pravesh Verma. He is also a criminal.… pic.twitter.com/5zF6pPpMMo
— ANI (@ANI) January 19, 2025
आतिशी यांच्या म्हणण्यानुसार, “शनिवारी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करणारे तीन जण हे भाजपचे सामान्य कार्यकर्ते नसून गुंड आणि गुन्हेगार असल्याचे या सर्व प्रकरणावरून दिसून येते. निवडणुकीच्या दहशतीमध्ये भाजप आता अरविंद केजरीवाल यांना मारण्याचा कट आखत असल्याचे स्पष्ट झाले आहे.” Delhi Assembly Elections 2025 |
‘निवडणूक आयोगाचे अधिकारी गप्प का?’
प्रवेश वर्मा यांनी एका हार्ड कोर गुन्हेगाराला आपल्यासोबत ठेवले आहे. या गुंडांना अरविंद केजरीवाल आणि आपसाठी नेमले गेले आहे. या घटनेनंतरही निवडणूक आयोगाचे अधिकारी गप्प आहेत. सद्यस्थितीत सर्वाधिक सत्ता निवडणूक आयोगाकडे असताना कोणतीही कारवाई होत नसल्याचे आतिशी यांनी म्हंटले आहे.
प्रवेश वर्मा यांचा आप’वर जोरदार प्रहार
तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणावर भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी एक व्हिडिओ जारी करून ‘आप’वर जोरदार प्रहार केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याची गाडी भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लेडी हार्डिंग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. नवी दिल्ली विधानसभेत लोक भाजपला विजय मिळवून देत आहेत, त्यामुळे ‘आप’ असे कारस्थान रचत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
हेही वाचा: