Singapore Open 2024 : पी.व्ही. सिंधूनं पहिल्या फेरीत केली शानदार विजयाची नोंद…

Singapore Open 2024 : भारतीय शटलर आणि दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूने बुधवारी सिंगापूर ओपन 2024 च्या पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या लाइन हॉजमार्क कजार्सफेल्डविरुद्ध सहज विजय नोंदवला. सिंधूने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात तिच्या डॅनिश प्रतिस्पर्ध्याचा 21-12, 22-20 असा पराभव केला.
Singapore Open: India’s PV Sindhu seals comfortable win in first round
Read @ANI Story | https://t.co/pJdJyuKkra#PVSindhu #SingaporeOpen #badminton pic.twitter.com/SIYMXfBsnI
— ANI Digital (@ani_digital) May 29, 2024
हा सामना 44 मिनिटे चालला. सिंधूने सुरुवातीपासूनच खेळावर वर्चस्व राखले. तिने पहिला सेट 21-12 असा सहज जिंकला. होजमार्कने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र सिंधूने 22-20 असा विजय मिळवत स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला.
याआधी, रविवारी सिंधूला मलेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत चीनच्या ‘वांग शी यी’कडून पराभव स्वीकारावा लागला होता. महिला एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत भारतीय शटलरला तिच्या चिनी प्रतिस्पर्ध्याकडून 21-16, 5-21 आणि 16-21 असा पराभव पत्करावा लागला होता. सिंधू 2023 च्या स्पेन मास्टर्सनंतर प्रथमच एखाद्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती.





