“सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै’; भारत-पाकिस्तान मॅचविरोधात ठाकरे गट उतरणार रस्त्यावर

Sanjay Raut on India-Pakistan Match | आशिया चषक स्पर्धेत १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये भारत-पाकिस्तान टी-२० क्रिकेट सामना होणार आहे. मात्र हा सामना रद्द करण्याची मागणी देशभरातून केली जात आहे. या सामन्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने देखील मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून ‘माझं कुंकू-माझा देश’ आंदोलन करण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ठाकरे गटाकडून रविवारी सरकारच्या भूमिकेविरोधात आंदोलन केले जाणार आहे.
खून आणि क्रिकेट कसं सोबत वाहणार?
संजय राऊत म्हणाले की, “अबुधाबीला भारत-पाक सामना खेळवला जात आहे. हे लोकभावनेविरुद्ध आहे. अजूनही 26 निरपराध लोक पहलगाम येथे मारले गेले, त्यांच्या कुटूंबाचा आक्रोश आम्ही अजूनही पाहत आहोत. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानच्या कारवाया कश्मिरमध्ये थांबलेल्या नाही. पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचे वक्तव्य सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंग आणि भाजपच्या बड्या नेत्यांनी वारंवार मांडला. पाकिस्तानबरोबर कोणतेही संबंध ठेवणार नसल्याचे ते म्हणाले. रक्त आणि पाणी सोबत वाहू शकत नाही असा दावा भाजप नेत्यांनी केला. मग आमचा प्रश्न आहे की खून आणि क्रिकेट कसं सोबत वाहणार?,” असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
पहलगाँव हमले में 26 माँ-बहनों का सिंदूर मिटा, उनका आक्रोश अभी थमा नहीं।⁰ऑपरेशन सिंदूर, जो आतंकी पाकिस्तान को तोड़ने के लिए शुरू हुआ, अभी खत्म नहीं हुआ।⁰फिर भी अबू धाबी में भारत-पाक क्रिकेट मैच खेला जा रहा है।(14th September)⁰बीजेपी मंत्रियों के बच्चे इसे देखने ज़रूर जाएँगे।… pic.twitter.com/tkQYMcb5nZ
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 11, 2025
‘माझं कुंकू-माझा देश’ आंदोलन छेडणार
संजय राऊत पुढे म्हणाले की, “शिवसेनेची महिला आघाडी 14 तारखेला रस्त्यावर उतरणार आहे. ‘माझं कुंकू-माझा देश’ असा आंदोलन केलं जाईल. “सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै’ असे आंदोलन असणार आहे. मोदींना महिला सिंदूर पाठवतील. ते अभियान सुद्धा आम्ही राबवणार आहोत. या मॅचचा निषेध आमचा पक्ष करेल. हा एक प्रकारे देशद्रोहच आहे. भाजपच्या नेत्यांची पोरं अबुधाबीला मॅच बघायला जातील. जय शाह तर क्रिकेटचे सर्वेसर्वा आहेत. अमित शाह आम्हाला राष्ट्रभक्तीच्या गोष्टी शिकवतात. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो, असे म्हणतात. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलेलो नाही.”
“बाळासाहेब ठाकरे यांनी भारत-पाक सामन्याला कायम विरोध केला आहे. एका बाजूला तुम्ही काश्मीरमध्ये रक्त सांडत असताना तुम्ही क्रिकेट खेळायला आमच्याकडे येतात? तुम्हाला लाजा वाटत नाही का? हा प्रश्न भारतीय जनता पक्षाला आहे. अरे तुम्ही तुमचे तोंड तरी उघडा. विरोध तरी करा. तुम्ही हिंदुत्ववादी आहात ना,” असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
“ऑपरेशन सिंदूर संपले नाही. महिलांचा आक्रोश थांबला नाही. आजही सर्व ठिकाणी वेदना आहेत आणि तुम्ही पाकिस्तान सोबत सामना खेळत आहात. शिवसेना हे सहन करू शकत नाही. आमच्या महिला रस्त्यावर उतरणार,” असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे. Sanjay Raut on India-Pakistan Match |
हेही वाचा:





