साधे कपडे, डोक्यावर टोपी आणि पायात स्लीपर…; कॉमेडियन सुनील पालचा व्हिडिओ पाहून चाहते हैराण

Sunil Pal Video | प्रसिद्ध भारतीय कॉमेडियन सुनील पालचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सुनील पालने ‘किस किसको प्यार करूं 2’ या कॅमेडी चित्रपटाच्या प्रिमिअरला हजेरी लावली होती. त्यावेळीचा सुनील पालचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने चर्चेत आला आहे. मात्र त्याची अवस्था पाहून अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
या व्हिडीओमध्ये सुनील पाल एकदम साध्या कपड्यात, पायात स्लीपर, डोक्यावर टोपी, शर्ट घातलेला दिसतो आहे. त्याला अशा अवतारात सुनीलला पाहून चाहते हैराण झाले आहेत. त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटलं आहे की, ‘सुनील पाल याची परिस्थिती पाहता हे खूप अडचणीत असल्याचं दिसत असून त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला मदत केली पाहिजे.’
View this post on Instagram
यावर आणखी एका युजरने म्हटलं आहे की, ‘सहकारी मदत करतील, पण हा त्यांनाही टीका करून उलटसुलट काहीतरी बोलेल. अशा लोकांची कुणीही मदत करत नाही. याने कुणाशीही चांगले संबंध ठेवले नाहीत, सगळ्यांना शिवीगाळ करतो, अशा लोकांची अवस्था शेवटी अशीच होते,’ अशा कमेंट या व्हिडीओवर आल्या आहेत. Sunil Pal Video |
सुनील पाल मिमिक्री आणि स्टँड-अप कॉमेडीसाठी ओळखला जातो. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या पहिल्या सीझनचा तो विजेता आहे. त्यानी ‘हम तुम’, ‘फिर हेरा फेरी’ आणि ‘अपना सपना मनी मनी’ यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका केली आहे. Sunil Pal Video |
हेही वाचा:
कथित निवडणूक धमकीप्रकरणी अजित पवारांना दिलासा; बारामती सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय





