सिमी ग्रेवालने ‘ती’ पोस्ट केली,’डिलीट’

Entertainment । सध्या अभिषेक बच्चन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिषेकचे त्याची सहकलाकार निम्रत कौरसोबत अफेअर असल्याची चर्चाही गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. ऐश्वर्या रायपासून वेगळा होणार आहे. या सर्व अफवांमुळे बच्चन कुटुंब सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
अशात बॉलिवूड अभिनेत्री आणि टॉक शो होस्ट सिमी ग्रेवाल बच्चन कुटुंबाच्या समर्थनार्थ समोर आली होती. सिमीने अभिषेकचा बचाव करणारी एक पोस्ट शेअर केली होती. मात्र या पोस्टमुळे ती चांगलीच ट्रोल झाली. ट्रोलिंग टाळण्यासाठी सिमीने आता तिची पोस्ट डिलीट केली आहे.
सिमी ग्रेवालने तिच्या शोमधील अभिषेकचा एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले,’मला वाटते की अभिषेकला वैयक्तिकरित्या ओळखणारे प्रत्येकजण सहमत असेल की, तो बॉलिवूडमधील सर्वोत्तम लोकांपैकी एक आहे. चांगली मूल्ये आणि सहज सभ्यता.’ असेही तिने या पोस्टमध्ये लिहिले होते. मात्र सिमीची ही पोस्ट लोकांना फारशी आवडली नसल्याचे दिसून येत आहे.
एका युजर्सने लिहिले,’ही पोस्ट करण्याची ही खूप वादग्रस्त वेळ आहे. हे योग्य नाही.’ या पोस्टवरून ट्रोल होताच सिमीने तिची पोस्ट डिलीट केली आहे. आता या पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.’
दरम्यान, अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला १७ वर्षे झाली आहेत. त्यांना आराध्या बच्चन ही मुलगी आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या बातम्या तेव्हा समोर येऊ लागल्या जेव्हा संपूर्ण बच्चन कुटुंब अंबानीच्या लग्नात एकत्र आले आणि ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत वेगळी झाली.





