पठाणी लूक, हटके डान्स… सलमान-रश्मिकाच्या ‘सिकंदर’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Sikandar Movie | सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ चित्रपटाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट या महिन्याच्या अखेरीस रिलीज होणार आहे. त्याआधी या चित्रपटातील पहिले गाणे ‘जोहरा जबीं’ रिलीज झाले आहे. रिलीज होताच या गाण्याने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे.
जबरदस्त बीट्स, शानदार कोरियोग्राफी आणि सलमान खानचा पठानी सूटमधील लूक या गाण्यामध्ये पाहायला मिळत आहे. यासोबतच अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील सलमान सोबत डान्स करताना दिसत आहे. या गाण्यामध्ये दोन्ही कलाकारांची अप्रतिम केमेस्ट्री दिसून आहे. ईदला खास बनवण्यासाठी सलमानने हे हटके गाणे चाहत्यांसाठी आणले आहे.
View this post on Instagram
साजिद नाडियाडवाला यांचे प्रोडक्शन आणि ए.आर. मुरुगदॉस यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘सिकंदर’ सिनेमातील हे गाणे प्रेक्षकांना आवडल्याचे पाहायला मिळत आहे. रिलीज होताच अवघ्या काही तासांमध्ये लाखो लोकांनी हे गाणे पाहिले आहे. हे गाणे संगीतकार प्रीतम यांनी संगीतबद्ध केले आहे. तर नक्ष अझीज आणि देव नेगी यांनी आवाज दिला आहे. कोरियोग्राफी फराह खानची आहे.
दरम्यान, सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ चित्रपट ईदच्या वेळेस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानचे चाहते अनेक दिवसांपासून त्याच्या या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदॉस यांनी केले आहे. सलमान शेवटचा 2023 मध्ये आलेल्या ‘टायगर -3’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसला होता. त्यामुळे ‘सिकंदर’ बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





