आता सौर ऊर्जाही महागण्याची चिन्हे
Updated On:

4 ते 8 रुपये प्रतियुनिट दरवाढ प्रस्तावित
पुणे – महावितरणकडून सर्वच स्तरावरील सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या आणि भविष्यात असे प्रकल्प उभारू इच्छिणाऱ्या सर्वच ग्राहकांकडून ग्रिड सपोर्ट चार्जेसच्या नावाखाली किमान 4 ते 8 रुपये प्रतियुनिट दरवाढ प्रस्तावित केली आहे. त्यामुळे सौर ऊर्जा संघटनेने या दरवाढीला विरोध दर्शविला आहे.
संघटनेने म्हटल्यानुसार, नैसर्गिक संपत्तीचा उपयोग करून प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी करण्याची संधी रुफटॉप रिन्यूएबल एनर्जी प्रकल्पांद्वारे प्राप्त झाली आहे. नागरिकाने स्वतः सर्व गुंतवणूक करून, स्वतः च्या वापराकरिता निर्माण केलेत्या उर्जेवर कोणतेही शुल्क लावणे कायदेशीरदृष्ट्या अयोग्य आहे. यामुळे आयोगाने 2019च्या नियमात ग्रीड कनेक्ट रुफटॉप रिन्यूएबल एनर्जीद्वारे तयार होणाऱ्या संपूर्ण ऊर्जेवर शुल्क लावण्याची तरतूद रद्द करावी.





