Siddharth Kharat : मेहकरमधील हाणामारीसाठी रायमुलकर जबाबादार; आमदार खरात यांचा आरोप
Updated On:

बुलढाणा : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रविवारी मेहकरमध्ये दोन गटामध्ये हाणामारी झाली. यामध्ये २३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या घटनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे माजी आमदार संजय रायमुलकर जबाबदार असल्याचा आरोप नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांनी केला आहे.
राजकीय पराभव रायमुलकर पचवू शकले नाहीत. हा पराभव केवळ त्यांचाच नसून खासदार प्रतापराव जाधव यांचाही असल्याचे खरात यांनी म्हटले आहे. खरात यांनी विजयाची मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीमध्ये वाद उत्पन्न होऊ नयेत यासाठी पोलिसांनी मिरवणुकीचा मार्ग बदलण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार खरात यांनी मार्ग बदलला असल्याचा दावा देखील केला आहे. त्याबरोबरीने शिंदे गटाच्या नेत्यांनी झालेला पराभव स्वीकारावा व शांतता राखावी असते आवाहन देखील आमदार खरात यांनी केले आहे.





