Riteish Deshmukh post : “सिद्धार्थ माझ्या भावा….”; वर्गमित्राच्या निधनानंतर अभिनेता रितेश देशमुखची भावुक पोस्ट

Riteish Deshmukh post : सर्वाेच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोमवारी १५ सप्टेंबर रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. अभिनेता रितेश देशमुख याने देखील सिद्धार्थ शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना पोस्टच्या माध्यमातून उजाळा दिला आहे. अत्यंत भावनिक पोस्ट रितेशने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
पोस्टमधून रितेशने आपल्या भावनांना मोकळी वाट केली आहे. अभिनेता रितेश देशमुखचे सिद्धार्थ शिंदे हे वर्गमित्र होते. तसेच रितेश देशमुख याच्या आगामी राजा शिवाजी चित्रपटात सिद्धार्थ शिंदे यांची छोटी भूमिका देखील होती, असं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये रितेश देशमुखने म्हटलं आहे. सिद्धार्थ शिंदे माझा शाळेतील वर्गमित्र आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील, खूप दयाळू, नम्र, नेहमीच हास्य आणि अढळ पाठिंबा देणारा होता असं रितेश देशमुखने म्हटलं आहे.
सहा वर्षांपूर्वी, जेव्हा त्याला समजले की, मी आपल्या प्रिय छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवत आहे. तेव्हा त्याने मला इतक्या उत्कटतेने फोन केला. रितेश, कृपया मला ‘राजा शिवाजी’चा भाग होऊ दे, जरी तो पडद्यावर छोटा सीन असला तरी. शिवरायांबद्दलचे त्याचे प्रेम हेच होते, अशी आठवण रितेशने पोस्टमधून सांगितली.
तसेच सिद्धार्थ, माझा भाऊ, तू एक दुर्मिळ रत्न होतास. तुझ्या कुटुंबासह प्रियजनांसोबक माझी मनापासून सहानुभूती. शांती लाभो, प्रिय मित्रा – तू आमच्या हृदयात कायमचा जिवंत राहशील अशा शब्दांत रितेश देशमुखने सिद्धार्थ शिंदे यांच्याप्रती असलेल्या भावना या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत.
My heart is heavy as I share this. Siddharth Shinde, my dear school classmate and a senior Supreme Court advocate , was a soul so kind, so humble, always there with a warm smile and unwavering support.
Six years ago, when he heard I was making a film on our beloved Chhatrapati… pic.twitter.com/wfJRbmtsJh— Riteish Deshmukh (@Riteishd) September 16, 2025
या पोस्टमध्ये रितेशने बॅालिवूड अभिनेता संजय दत्त याच्यासोबत शुटिंगमध्ये दोन दिवस एकत्र घालवले सांगताना काही महिन्यांपूर्वी, आम्ही संजय दत्त सरांसोबत दोन सुंदर दिवस एकत्र शूटिंगमध्ये घालवले. त्यांच्या उपस्थितीने सेटवर वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. आज त्याचा सीन एडिट करत असताना, त्याने किती सुंदर काम केलं आहे हे पाहत हसत असताना, हा आनंद त्याच्यासोबत शेअर करण्यासाठी फोन करावा असं मला वाटलं.
मग धक्कादायक बातमी आली, की तो आता आपल्यात नाही. आपण एकत्र हा चित्रपट पाहत आहोत, हसत आहोत, आठवणी काढत आहोत याची कल्पना करतानाही माझं मन भरुन येत आहे. नियतीने काही वेगळंच ठरवलेलं, असंही रितेशने पोस्टमध्ये म्हटलं आहे. वकील सिद्धार्थ शिंदें यांच्या अकाली निधनाची वृत्त न पचवणारे आहे, त्यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : Pimpri : छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे काम महिन्याभरात पूर्ण होणार





