IND vs SA : शुबमन गिल चौथ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर? ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

Shubman Gill rule out IND vs SA 4th T20I : लखनौमधील सामन्याला धुक्यामुळे उशिरा सुरू होणार आहे. नऊ वाजता पंच मैदानाची पाहणी करुन सामना सुरु करण्याचा निर्णय घेतील. या चौथ्या टी-२० सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघात मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. शुबमन गिलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले आहे. त्याच्या जागी संजू सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
शुबमन गिलचा खराब फॉर्म चिंतेचा विषय –
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सराव सत्रादरम्यान गिलच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली, ज्यामुळे त्याला या महत्त्वाच्या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. शुबमन गिल गेल्या काही काळापासून टी-२० क्रिकेटमध्ये धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. गेल्या १८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही.
२०२५ मध्ये गिलने १५ टी-२० सामन्यांत केवळ २४.२५ च्या सरासरीने २९१ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चालू मालिकेतही त्याची बॅट शांतच राहिली. कटक येथे तो केवळ ४ धावांवर बाद झाला, तर चंदीगडमध्ये त्याला खातेही उघडता आले नाही. धर्मशाला येथील सामन्यात त्याने २८ धावा केल्या, पण त्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला होता.
हेही वाचा – Varun Chakaravarthy : फिरकीचा जादूगर वरुण ठरला नंबर-१! बुमराहला मागे टाकत कोणालाच न जमलेला केला पराक्रम
संजू सॅमसनवर अन्याय होत असल्याची चर्चा –
🚨 BAD NEWS FOR INDIA 🚨
– Shubman Gill is likely to miss the 4th T20I today due to an injury to his toe. [Sahil Malhotra from TOI] pic.twitter.com/fFXCaF8QRm
— Johns. (@CricCrazyJohns) December 17, 2025
दुसरीकडे, संजू सॅमसनला सतत बेंचवर बसवल्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला होता. सॅमसनने गेल्या वर्षी सलग दोन मालिकांमध्ये तीन शतके ठोकून आपली क्षमता सिद्ध केली होती. मात्र, गिलला उपकर्णधार बनवल्यानंतर संजूचा फलंदाजीचा क्रमांक बदलण्यात आला आणि अखेर त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनच बाहेर पडावे लागले होते. चाहत्यांच्या मते, गिलला संधी देण्यासाठी फॉर्मात असलेल्या सॅमसनवर अन्याय केला जात होता.
हेही वाचा – AUS vs ENG : ॲशेसमध्ये ‘टेक्निकल’ राडा! आऊट असूनही दिले ‘नॉट आऊट’; कंपनीनेही मान्य केली चूक, पाहा VIDEO
निवड समितीसमोर पेच?
आता लखनऊ टी-२० मध्ये संजू सॅमसनला आपली छाप सोडण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. जर या सामन्यात संजूने मोठी खेळी खेळली, तर आगामी सामन्यांमध्ये त्याला संघातून डच्चू देणे व्यवस्थापनासाठी कठीण जाणार आहे. शुबमन गिलची दुखापत संजूसाठी ‘संधी’ ठरणार की गिल पुन्हा संघात पुनरागमन करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





