ICC ODI Rankings : ईशान व गिलची क्रमवारीत प्रगती

दुबई :- आयसीसीने एकदिवसीय तसेच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात भारताचे नवोदित खेळाडू शुभनम गिल व ईशान किशन यांनी प्रगती केली आहे.
गिल फलंदाजांच्या क्रमवारीत 2 स्थानांनी झेप घेत 5 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर ईशान याने 9 स्थानांनी झेप घेत 45 व्या क्रमांकावरून 36 वे स्थान मिळवले आहे. लोकेश
राहुल याची 4 स्थानांनी घसरण झाली असून 46 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. शिखर धवन याची 40 वरून 42 व्या स्थानावर घसरण झाली आहे. श्रेयस अय्यर 31 व्या स्थानी तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने 11 वे स्थान कायम राखले असून विराट कोहलीनेही 9 वे स्थान कायम राखले आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम अव्वलस्थानी आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत कुलदीप यादव टॉप 10 मध्ये दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेजलवूडने अव्वलस्थान कायम राखले आहे.





