Champions Trophy 2025 : शुबमन गिल साराला नव्हे, तर ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? सोशल मीडियावर चर्चेला उधाण, जाणून घ्या कोण आहे ती?

Shubman Gill is dating Actress Avneet Kur as rumoured : भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू आणि बॉलिवूड स्टार्स अनेकदा एकमेकांच्या नात्याबद्दल सतत चर्चेत असतात. अनेक वेळा या स्टार्सच्या डेटिंगच्या बातम्याही चर्चेत येतात. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकल्यानंतर, शुबमन गिलच्या डेटिंगच्या बातम्यांना आता वेग आला आहे. भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिल बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौरला डेट करत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरत आहे. दुबईहून अभिनेत्रीच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चांना आणखी बळकटी मिळाली आहे. या अगोदर शुबमन सारा तेंडुलकरला डेट करत असल्याची चर्चा होती.
खरं तर, गेल्या आठवड्यात, अवनीत कौर दुबईमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्याला उपस्थित होती. या सामन्याच्या दिवसाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना अवनीतने लिहिले होते की, ‘इंडिया इंडिया. तुम्ही सामना पाहत आहात का? अवनीत कौरची ही पोस्ट सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाली. चाहत्यांना तिच्या या पोस्टवर लाईक्सचा पाऊस पाडला. तसेच, लोकांनी कमेंट करुन विचारत आहेत की ती शुभमन गिलला सपोर्ट करत होतीस का?
भारताने ट्रॉफी जिंकल्यानंतर अवनीतने मारल्या उड्या –
या अफवांमध्ये, अवनीत कौरने अंतिम सामन्यातील तिचा व्हिडीओही शेअर केला. ती न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील सामन्याचा आनंद घेताना दिसली. जेव्हा भारताने अखेर ट्रॉफी जिंकली तेव्हा तिनेही आनंदाने उड्या मारल्या. ही क्लिप शेअर करताना अवनीतने लिहिले, ‘जिंकलो…’
View this post on Instagram
कोण आहे अवनीत कौर ?
१३ ऑक्टोबर २००१ रोजी जन्मलेली अवनीत कौर ही पंजाबची रहिवासी आहे. त्याने वयाच्या ८ व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती पहिल्यांदाच ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’ या डान्स शोमध्ये दिसली. या शोमधून उपांत्य फेरीपूर्वीच ती बाहेर पडली. पण या शोनंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली आणि तेव्हापासून ती सतत इंडस्ट्रीत सक्रिय झाली.
२०१२ मध्ये, तिने पुन्हा ‘एकदा मेरी माँ’ या मालिकेत झिलमिलच्या भूमिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ती ‘झलक दिखला जा’, ‘सावित्री एक प्रेम कहानी’, ‘एक मुठ्ठी आसमान’ ते ‘अलादीन नाम तो सुना होगा’ या चित्रपटांमध्ये दिसली. एवढेच नाही तर वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी तिने ‘मर्दानी’, ‘करीब करीब सिंगल’ ते ‘टिकू वेड्स शेरू’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.





