Shubhanshu Shukla : “शुभांशू शुक्ला यांनी अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा दिली…”; पंतप्रधान मोदींनी केले जोरदार स्वागत

Shubhanshu Shukla – आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर वास्तव्य करण्याच्या ऐतिहासिक मोहिमेवरून पृथ्वीवर परतलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत प्रवास करणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी केलेली कामगिरी देशाच्या अंतराळ संशोधनाच्या प्रवासात एक महत्त्वाची घटना आहे.
अंतराळातील ऐतिहासिक मोहीम पूर्ण करून पृथ्वीवर परतणारे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे मी संपूर्ण देशासोबत स्वागत करत आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून त्यांनी, त्यांची समर्पित वृत्ती, धैर्य आणि अग्रणी राहण्याच्या भावनेने अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा दिली आहे. गगनयान- या मानवी अंतराळ मोहिमेच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे पंतप्रधानांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
7 दिवस डाॅक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणार –
कॅप्सूलमधून बाहेर पडल्यानंतर शुभांशु आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हेलिकॉप्टरद्वारे सॅन डिएगो किनाऱ्यावरील पुनर्वास केंद्रात नेण्यात आले. तिथे ते सात दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेतील. अंतराळातील दीर्घ मुक्कामामुळे हाडे, स्नायू आणि संतुलन प्रणालीला पुन्हा अनुकूलन आवश्यक आहे. तज्ज्ञांची टीम त्यांच्या आरोग्याची सतत निगरानी करत आहे.
मोहीम यशस्वी –
अॅक्सिऑम-4 मोहिमेअंतर्गत शुक्ला आणि त्यांचे सहकारी मंगळवारी पृथ्वीवर परतले. स्पेसएक्स ड्र OtisSystem: रॅगन ‘ग्रेस’ यान दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावरील प्रशांत महासागरात यशस्वीपणे उतरले. ही मोहीम भारताच्या अंतराळ संशोधनातील एक ऐतिहासिक टप्पा ठरली आहे.





