“माझ्या खांद्यावर तिरंगा, जय हिंद, जय भारत” ; अंतराळातून शुभांशू शुक्लाचा देशासाठी पहिला संदेश

Shubanshu Shukla First Message । भारताचे शुभांशू शुक्ला यांनी इतर तीन अंतराळवीरांसह अॅक्सिओम-४ मोहिमेसाठी केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण केले आहे. हे अभियान भारताचे शुभांशू शुक्ला चालवत आहेत. अवकाशात पोहोचताच त्याने पहिला संदेश देशाला पाठवला. शुभांशू यांनी आपल्या पहिल्या संदेशात,”माझ्या खांद्यावर तिरंगा आहे. संपूर्ण देश माझ्यासोबत आहे. ” असे त्यांनी म्हटले. तसेच अंतराळ मोहिमेवर जाण्यापूर्वी त्यांनी सर्वांचे आभार मानले.
अमेरिकेतील फ्लोरिडाच्या नासाच्या केनेडी स्पेस सेंटरपासून सुरू झालेल्या या मोहिमेत क्रू कंपनीच्या फाल्कन ९ रॉकेटचा वापर केला जात आहे. सर्व अंतराळवीर एका नवीन स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानात आहेत. अवकाशात पोहोचल्यानंतर शुभांशूने देशाला पहिला संदेश पाठवला.
After 41 years, India’s flag will fly in space again.
Jai Hind 🇮🇳 pic.twitter.com/9BJKHeCjNZ
— Shubhanshu Shukla (@IndiaInSky) June 25, 2025
शुभांशू शुक्लाचा अंतराळातून देशासाठी संदेश Shubanshu Shukla First Message ।
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी, “नमस्कार, माझ्या प्रिय देशवासीयांनो! आपण ४१ वर्षांनी पुन्हा अवकाशात पोहोचलो आहोत. हा एक अद्भुत प्रवास आहे. आपण पृथ्वीभोवती ७.५ किलोमीटर प्रति सेकंद वेगाने प्रदक्षिणा घालत आहोत. माझ्या खांद्यावरील माझा तिरंगा मला सांगतो की मी तुमच्या सर्वांसोबत आहे. ही माझ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) प्रवासाची सुरुवात नाही, तर ही भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे. तुम्ही सर्वांनी या प्रवासाचा भाग व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुमची छातीही अभिमानाने फुलली पाहिजे. आपण सर्वजण मिळून भारताचा मानवी अंतराळ कार्यक्रम सुरू करूया. जय हिंद! जय भारत!”असे म्हटले आहे.
अॅक्सिओम-४ मोहिमेवर गेलेल्या अंतराळवीर शुभांशू शुक्लाच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. कुटुंबाने सांगितले की त्यांना त्यांच्या मुलाच्या कामगिरीचा अभिमान आहे. शुभांशूच्या संपूर्ण कुटुंबाने आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्यामुळे आज आमची छाती अभिमानाने भरून आली आहे, असे कुटुंबीयांनी सांगितले. Shubanshu Shukla First Message ।





