श्रुती मराठेची बॉलीवूडमध्ये एन्ट्री; नाना पाटेकरांसोबत शेअर करणार स्क्रीन

Shruti Marathe | मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेने मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. याशिवाय अलीकडेच तिने साऊथ सिनेमात देखील काम केले आहे. ‘देवरा’ या साऊथ सिनेमात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या बॉलीवूड चित्रपटातील एन्ट्रीची माहिती चाहत्यांना दिली आहे.
श्रुती मराठे आता लवकरच बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वनवास’ या नाना पाटेकरांच्या सिनेमात श्रुतीची वर्णी लागली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्यात तिची झलक पाहायला मिळत आहे. श्रुतीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. ज्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
View this post on Instagram
अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट २० डिसेंबरला रिलीज होणार आहे. या ट्रेलरमध्ये आपुलकीच्या शोधात असलेल्या भावनिक कथेची झलक दिसते. वनवास सिनेमात नाना पाटेकर आणि अभिनेता उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.
अनिल शर्मा यांना गदर: एक प्रेम कथा, गदर 2 यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. मुलांचे संगोपन करणे हे पालकांचे कर्तव्य आहे आणि पालकांची काळजी घेणे मुलांचे कर्तव्य आहे, हे ट्रेलरमध्ये दाखवले आहे. ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे.
हेही वाचा:





