Shruti Marathe – झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘राधा ही बावरी’ मधून अभिनेत्री ‘श्रुती मराठे’ महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली आहे. मराठी सिनेविश्वातील बोल्ड अँड ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून श्रुतीला ओळखले जाते. श्रुतीचा जन्म ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला.
मॉडेलिंगपासून करीअरची सुरुवात करणाऱ्या श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकर सोबत 2016 साली विवाह केला. सध्या श्रुती महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
श्रुती मराठेने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या लाजवाब अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रुतीने तमिळ भाषेतील ‘इंदिरा विजहा’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असणारी श्रुती आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सतत आपल्या फॅन्ससह शेअर करते असते. नुकतेच श्रुतीने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून,
तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. निळ्या साडीवर श्रुतीने केशरी रंगाचा बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे. साडीतील लूकवर श्रुतीने ऑक्सिडाइज्ड दागिने परिधान केले आहेत.
श्रुतीच्या या फोटोंनी चाहत्यांना अक्षरशः भुरळ पाडली आहे. श्रुती च्या चेहऱ्यावरील स्मित हास्य नेहमीच रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आले आहे. म्हणूनच श्रुतीचे फॅन्स तिच्या व्हिडिओ आणि फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करतात. श्रुती कोणत्याही रंगाच्या साडीत अतिशय ग्लॅमर आणि मादक दिसत असते.