Shruti Haasan : श्रृती हासनची कातिलाना अदा; पिंक साडीमध्ये खुलले सौंदर्य
Shruti Haasan : श्रुतीचे गुलाबी साडीवरचे हे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करुन श्रुतीच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Shruti Haasan : अभिनेत्री श्रृती हासन हिची केवळ ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांची मुलगी एवढीच ओळख नसून तिने आपल्या दमदार अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने आजवर अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे.
बॅालिवूड आणि टॅालिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत तिने स्क्रिन शेअर केली आहे. सध्या श्रृती तिच्या लुकमुळे चर्चेत आली आहे.अलिकडेच श्रृतीने खास पिंक साडीवर फोटोशूट केले आहे. गुलाबी साडीवर अभिनेत्रीचा कातिलाना अदा पाहून नेटकरी फिदा झाले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने गुलाबी रंगाची साडी नेसली होती.
तिनं मिनिमल मेकअप लूक कॅरी केला होता. तसेच लूक कम्प्लीट करण्यासाठी तिनं छोटी टिकली लावली होती. या लूकवर तिने केस ओपन ठेवले होते. तसेच कानात झुमके घातले होते. झुमक्यांमुळे अभिनेत्री सुरेख दिसत होती.
श्रुतीचे गुलाबी साडीवरचे हे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करुन श्रुतीच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. Shruti Haasan
श्रुती हासनच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, श्रुती शेवटची रजनीकांतच्या ‘कुली’ या चित्रपटात दिसली होती. या वर्षी ती ‘ट्रेन’ आणि ‘सालार 2’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. Shruti Haasan
हेही वाचा:







